Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस

सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस

नार,पार, नद्यांना पूर; पिपळसोंड गावाचा संपर्क तुटला

- Advertisement -

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

तालुक्यात शनिवारी सकाळ पासूनच पावसाने जोर धरला असल्याने नार,पार, मान, तान आणि अंबिका नद्यांना मोठे पुर आले आहे. अनेक ठिकाणी सांडवा पुल पाण्याखाली गेले. तर काही ठिकाणी जनावरे वाहुन गेली. परिसरातील वीज पुरवठा खंडीत झालेला होता. तर पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क खंडीत झाला होता.

पपळसोंड परिसरात वीज गायब गायब झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्यातील नदी, नाले, ओहळ यांना महापुर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर अनेक रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मो-यांची फरशी असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात, बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत.

खुंटविहीर जवळील उंबरपाडा(पि) येथील नागरिक शेती कामानिमित्त पिंपळसोंड येथे गेले होते. ते पंधरा ते वीस नागरिक गावाजवळील फरशी वरुन पुराचे पाणी वाहात असल्याने अंबिकेची उपनदी कुंभारचोंड ओहोळच्या पलीकडे अडकून पडले. उंबरपाडा ह येथे एका बैलांनी पुरात उड्या मारुन नदी पार केली तर शेतकरी मात्र नदीच्या काठावर अडकून पडला आहे.

कुंभारचोंड नदीला धुकट्या डोंगराचा तीव्र उताराचा भागात पुराच्या पाणी तीव्र वेगाने वाहत होते. पिंपळसोंड गावाला पुल बांधावा अशी मागणी शिवराम चौधरी, मणिराम चौधरी, तुळशीराम खोटरे, सोन्या बागुल, नारायण गावित,देवराम महाले,मोतीराम चौधरी या नागरिकांनी केली आहे. तर दुसरीकडे बा-हे भागातील आंबुपाडा(बे) येथील वाकी नदीला पुर आल्याने आंबुपाडा, जांभुळपाडा,कोटंबी,मोधळपाडा,खिरमाणी,कळमणे या गावांचा बा-हे भागाशी तसेच तालुक्याशी संपर्क तुटला आहे .

सरपंच भाऊ भोंडवे,विलास भडांगे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश गांगोडे, माधव वाघमारे,चंदर चौधरी,यादव जाधव, जगदीश पवार,युवराज गवळी,नंदराज भोंडवे,नामदेव जाधव, प्रकाश गावित,परशराम गावित, विलास गावित.दतु वाघमारे,आणि ग्रामस्थ आंबुपाडा, जांभुळपाडा,कोटंबी, मोधळपाडा, खिरमाणी, कळमणे यांनी पुलाची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या