Friday, June 21, 2024
Homeनाशिकयेवला शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी; शेताचे बांध फुटून पाणी वाहीले

येवला शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी; शेताचे बांध फुटून पाणी वाहीले

येवला | प्रतिनिधी
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील खामगाव पाटी येथे सोलरवर वीज पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाटोदा येथे झाड अंगावर पडून म्हैस ठार झाली आहे.

- Advertisement -

शहरासह तालुक्यातील पाटोदा, राजापूर, नगरसुल, अंदरसुल, मुखेड परिसरात मंगळवारी, (दि. ११) दुपारच्या सुमारास पवसाने हजेरी लावली. खिर्डीसाठे, कुसुर, कुसमाडी, नायगव्हाण, चिचोंडी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी केले. खिर्डीसाठे परिसरात तर शेताचे बांध फुटून पाणी वाहीले. तर काही गावांत मात्र पावसाचा पत्ता नाही. धुळगाव येथेही ठराविक अंतरात जोरदार पाऊस झाल्याने पाणी वाहिले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील खामगाव पाटी येथे शेतकरी साहेबराव कदम यांच्या शेतात असलेल्या सोलरवर वीज पडून सोलरचे प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाटोदा येथील दिनकर पाचपुते यांच्या घरासमोर झाडाखाली बांधलेल्या म्हशीवर झाड पडून म्हैस ठार झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या