Saturday, October 12, 2024
Homeनाशिकभाऊ, घ्या करून ऍडजस्ट...; पंपावर हेल्मेट, रस्त्यावर नो हेल्मेट

भाऊ, घ्या करून ऍडजस्ट…; पंपावर हेल्मेट, रस्त्यावर नो हेल्मेट

नाशिक | Nashik

“भाऊ, हेल्मेट आहे न तुझ्याकडे मग पेट्रोल टाकून गाडी आणून दे ना”, “भाऊ, आजचा दिवस जाऊद्या ओ, उद्या घेतो हेल्मेट”, “घ्या करून आज ऍडजस्ट”, “फॉर्म वैगेरे नको दादा, आजच्या दिवस द्या पेट्रोल” हे वाक्य आहेत शहरातील विविध पेट्रोल पंपावरचे…

- Advertisement -

स्वातंत्रदिनाच्या मुहूर्तावर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत (Nashik City Police) सुरू करण्यात आलेल्या नो हेल्मेट, नो पेट्रोल (No Helmet No Petrol) या अभियानाला शहरात पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांण्डे्य (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ उपक्रमाला सुरुवात केली.

या उपक्रमाचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते गंगापूर रोडवरील (Gangapur Road) सद्भावना पेट्रोल पंपावर उद्घाटन देखील झाले. मात्र, नाशिककरांनी या अभियानाला न जुमानता पहिल्याच दिवशी पेट्रोल पंपावर हेल्मेट नसतानाही इतरांच्या मदतीने पेट्रोल भरून वाहने फुल्ल केली.

अपघाती मृतांची संख्या कमी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाते. मात्र बेशिस्तांकडून हेल्मेटचा वापर होत नसल्याने मृत्यूचा धाेका कायम असतो. यामुळे पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या संकल्पनेतून नो हेल्मेट नो पेट्रोल हा उपक्रम पुढे आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संमतीने हा उपक्रम शहर पोलिसांनी हाती घेतला.

जनजागृतीसाठी पोलीस निरीक्षक पंपावर

दरम्यान, मुंबई नाका पोलीस स्थानक हद्दीतील पेट्रोल पंपावर जातीने हजर होत जनजागृती केली. त्यामुळे तोपर्यंत नो हेल्मेट-नो पेट्रोल ही मोहीम त्या ठिकाणी यशस्वी झाली; तर पोलीस अधिकारी निघून जाताच पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या