Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपुरग्रस्तांसाठी देवळाली मतदारसंघातून मदतीचा ओघ

पुरग्रस्तांसाठी देवळाली मतदारसंघातून मदतीचा ओघ

देवळाली कॅम्प | Deolali Camp

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील (Flood In Raigad District) अनेकांचे प्रपंच वाहुन काहींचे अतोनात नुकसान झाले. जीवन जगावे कसे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. सरोज आहिरे (NCP MLA Saroj Ahire) यांच्या पुढाकारातुन देवळाली मतदारसंघातील ग्रामस्थ पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जात मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे….

- Advertisement -

कोकण च्या आ. आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती देऊन सुतारवाडी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन आ. आहिरे यांना केले असता आ.आहिरेनी पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा अशी हाक देवळाली मतदारसंघातील ग्रामस्थांना देताच मतदारसंघातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला यातुन खऱ्या अर्थाने माणुसकी दिसुन आली.

प्रामुख्याने लाखलगाव, कोटमगाव, जाखोरी, कालवी, मातोरी सह इतर गावांनीही त्यांच्या हाकेला मदतीचा हात दिला आणि गृहउपयोगी वस्तूंचे पाचशे किट जमा झालेत. त्यात घरगुती वस्तू, बादली, तीन भांडी, चमचे, मग, डाळींसाठी बाटल्या, मिरचीसाठी डबा, अगदी सांडशीसुद्धा आहे. तसेच गव्हाचे पीठ, तांदूळ, मीठ, तेलाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या यांचे किटही जमा झाले. काल सायंकाळी या वस्तूंचा ट्रक सुतारवाडी, रायगड येथे रवाना झाला.

यावेळी माजी नगरसेविका शोभा आवारे, बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर, राष्ट्रवादीचे नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, रा यु जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सोमनाथ बोराडे आदींनी मतदारसंघातील जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आ. सरोज आहिरे यांनी स्वतः एक लाख रुपये यासाठी खर्च केल्याचे कोटमगाव सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला आ. आहिरे यांनी हिरवा झेंडा दाखविला.

त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, वसंत अरिंगळे, शांताराम भागवत, शशिकांत आवारे, डॉ. प्रवीण वाघ, दिपाली अरिंगळे, संदेश टिळे, शशी थेटे, सुधाकर ओहळ, राजाभाऊ जाधव आदी आवर्जून उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या