Tuesday, November 19, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१९

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१९

किशोरवय म्हणजे १० ते १९ वयोगटातील मूले. भारतातील लोकसंख्येच्या २२ टक्के नागरिक या वयोगटात येतात.

या काळात शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल फार झपाट्याने होतात. त्यामुळे मुले-मुली भांबावून जातात. त्याच्यात भर म्हणजे मुलांचे मुलींप्रती व मुलींचे मुलांप्रती आकर्षण. शरीरातील हार्मोन्स गोंधळ घालायला लागतात. यात त्या मुला-मुलींची चूक नसते. पण त्यांना समजून घेणे गरजेचे असते. त्यासाठी किशोरवयीन मुलांना त्यांच्यात होणाऱ्या बदलांबद्दल नीट माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमधून मुलांना प्रबोधन आवश्यक आहे. डॉक्टर्स यात सर्वांत उत्तम प्रबोधन करू शकतात.

- Advertisement -

आजकाल विभक्त कुटुंब जास्त दिसतात. त्यातही दोन्ही पालक काम करणारे असतात. त्यामुळे मुले घरी बराच काळ एकटेच असतात. लैंगिक आकर्षण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या याचे अपूरे ज्ञान असल्याने परिणामी बरेचदा यातून किशोरवयीन मुलींना गर्भधारणा होते. तसेच अजूनही काही गावांमध्ये १८ वर्षांच्या कमी वयाचा मुलींचे लग्न होतात.

Bora’s photograph features in Newsletter for Birdwatchers

भारतात सुमारे ४५% ते ४७% मुलींचे १८ वर्षे वय होण्याच्या आतच लग्न होत असल्यामुळे, ही एक मोठीच समस्या आहे. गर्भधारणा होऊ नये म्हणून काय उपाय करावेत, याबद्दलचे ज्ञान मुलामुलींना नसते. त्याबाबत बोलायची हिंमतही नसते. २१ वयापर्यंत मुलींचे शरीर गर्भधारणेसाठी परिपक्व झालेले नसते. त्यामुळे या वयात झालेली गर्भधारणा गर्भ आणि मुलगी दोघांना हानी पोहोचवू शकते.

पुरेशी काळजी घेतली नाही, तर गर्भधारणा व लैंगिक आजार एचआयव्ही, एड्सची शक्यता वाढते. परिणामी भावनिक, मानसिक समस्या येतात. आत्मविश्वास खचतो. हे सगळे टाळण्यासाठी मुलांना त्यांच्यातील बदलांबाबत व तसेच गर्भधारणा न व्हावी या साठी गर्भनिरोधक काय वापरावे याची माहिती देणे आता काळाची गरज बनली आहे.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१७

एखादी मुलगी जर वय वर्ष १८ च्या आधी गरोदर राहिली तर त्याला टीनएज प्रेग्नन्सी किंवा अल्पवयीन गर्भधारणा असे म्हटले जाते. टीनएज प्रेगनन्सी बाळ आणि आई दोघांच्या दृष्टीने योग्य नसते. त्याचप्रमाणे किशोर वयात लैंगिक संबंध ठेवणंही योग्य नाही. पण जर मुलगी गरोदर राहिलीच तर किशोर वयातील आईवर आणि बाळावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतले पाहिजे.

किशोर वयातील गरोदरपणाचे परिणाम :

किशोर वयातील गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडावर (किडनी) ताण येऊन काहीवेळा परिस्थिती जीवघेणी बनू शकते. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार मागे लागण्याचीही शक्यता असते.

लहान वयात गरोदरपण आले तर बाळ वेळेआधीच (प्रीमॅचुअर) जन्माला येणं किंवा कुपोषित बाळाचा जन्म होणेही शक्य असते. याचा परिणाम म्हणजे बाळाच्या शरीराची/ अवयवांची अपुरी वाढ होते. ३७ आठवड्यांआधी जर बाळाचा जन्म झाला तर अपूर्ण वाढ झालेले बाळ जन्माला येण्याची शक्यता दाट असते. यातल्या काही समस्या जन्मानंतरही तयार होऊ शकतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात. आयुष्यभरासाठी आजार बाळाच्या मागे लागू शकतात. मेंदू आणि हृदयावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. श्वास घ्यायला, स्तनपान करायला त्रास होणे, कॉग्नेटिव्ह म्हणजे आकलनाशी निगडित कौशल्ये विकसित न होणे अशाही समस्या उद्भवू शकतात. बाळ बाळंतपणात दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१६

किशोर वयातील गरोदरपणात मुलींना काहीवेळा मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासमोर जायची लाज वाटू शकते. ज्यामधून नैराश्य येऊ शकते आणि या सगळ्याचा बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

किशोर वयातील गरोदरपणात काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे?

एखादी मुलगी किशोर वयात गरोदर राहिली तर सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तिला योग्य ते वैद्यकीय उपचार मिळायला हवेत त्याच बरोबर पॉस्को कायद्यांतर्गत या गर्भधारणेची नोंद होणे हे अतिशय आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांचं मार्गदर्शन तर मिळालं पाहिजेच पण पॉस्को कायद्यांतर्गत नोंद ही स्री रोग तज्ञामार्फत होते. या काळात कशी काळजी घ्यायची, काय खायचे, काय टाळायचे या गोष्टी स्त्री रोगतज्ञ व्यवस्थित समजावून देऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे म्हणजे मग गरोदरपण आणि बाळंतपण दोन्ही सुखकर होऊ शकते.

खालील पैकी कुठलीही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरशी संपर्क करून उपचार घेतले पाहिजेत.

१) योनीमार्गातून रक्तस्त्राव

२) योनीमार्गातून द्रव स्त्राव

३) सतत उलट्या होणं

४) ओटी पोटात दुखणं

५) अंधुक दिसणं

६) तीव्र डोकेदुखी

७) थंडी ताप

८) शुच्या जागेपाशी जळजळ किंवा वेदना

९) पायांवर सूज

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५

किशोर वयातील गरोदरपण टाळता येऊ शकते. ते टाळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लहान वयात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत. याशिवाय लैंगिक शिक्षण आणि गर्भ निरोधके वापरूनही गरोदरपण टाळता येऊ शकते. त्यातूनही जर किशोर वयात गरोदरपण आलेच तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती काळजी घेतलीपाहिजे.

मुलांच्या वाढत्या वयात पालकांचीच भूमिका मोलाची असते. पालक हेच मुलांचे पहिले मित्र, मैत्रिण असायला हवे. त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधावा. त्यांचे मित्र मैत्रिणींबद्दल माहिती ठेवावी. मुलांना समुपदेश करावे. लैंगिक बाबतीत काही प्रश्न असतील तर ते निसंकोच हाताळावे. मुलांशी सुसंवाद हाच या समस्येचा मुख्य उपाय आहे. नवजात मुलांना कसे सांभाळायचे याबाबत बरेच पालक कार्यशाळांना जातात. पुस्तके वाचतात. पण वयात येणाऱ्या मुलांना कसे हाताळावे, याबाबत कोणीही कार्यशाळेची मदत घेत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. या गोष्टींकडे आता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉ .गौरी पिंपराळेकर

स्रीरोग तज्ञ

सह्याद्री हॉस्पिटल

नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या