किशोरवयीन मुलांसाठी स्क्रीन टाईमचा सुयोग्य वापर
‘स्क्रीन टाईम’,म्हणजे, एखादी व्यक्ती कुठल्याही, स्क्रीन असलेल्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणासमोर (उदाहरणार्थ : टीव्ही, संगणक, मोबाईल फोन इत्यादी) दिवसातला जितका वेळ घालवते तो वेळ म्हणजे त्या व्यक्तीचा स्क्रीन टाईम. अशी ढोबळमानाने व्याख्या करता येईल. मोबाईल, टीव्ही पाहण्यासाठी किशोरवयीन मुलांनी दिलेला वेळ आणि त्यांचे मानसिक आरोग्य यासंबंधी एक संशोधन वॉशिग्ंटन विद्यापीठाने केले आहे. त्यानुसार अशा उपकरणांच्या नियमित वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
पूर्वी पालक शाळकरी मुलांच्या हातात फार वेळ मोबाईल देत नसत. परंतु करोना काळात लाॅकडाऊन मुळे, शिक्षण चालू ठेवण्यासाठी तात्कालीक पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. ही नवीन शिक्षण पद्धती शिक्षकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी कष्टपूर्वक आत्मसात केली. परंतु टाळेबंदी उठल्यानंतर, प्रत्यक्ष शाळेत शिक्षण सुरू झाले तरीदेखील लॅपटॉप, मोबाईलची झालेली मैत्री काही कमी झाली नाही. किंबहुना त्याचे व्यसनात रूपांतर झाले. किशोरवयीन मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे होणारे चांगले परिणाम तसेच दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.
किशोरवयीन मुलांनी साधारण कि ती वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर घालवावा याची चर्चा सुरू झाली आहे. काही तज्ञांच्या मते कि शोरवयीन मुलांनी दिवसातून जास्तीत जास्त दोन तास स्क्रीन समोर घालवण्यास हरकत नाही. पण बदलत्या जीवनशैलीनुसार हे कि तपत जमेल हा प्रश्नच आहे. इतके हे संगणक, मोबाईल आजच्या जगात आवश्यक झाले आहेत. त्याचे काही फायदेही आहेत.
उदा…
* जगाच्या संपर्कात राहता येते.
* ज्ञानात भर पडते.
* शाळेतील काही होमवर्क, प्रोजेक्ट करण्यासाठी मदत होऊ शकते.
* लेक्चर्स ऐकणे, अभ्यास करणे तसेच परीक्षा देणे ह्या आवश्यक गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो.
स्क्रीन टाईम प्रमाणाबाहेर वाढल्यानंतर होणारे बरेच तोटे आहेत. त्यापैकी काही खालील प्रमाणे..
* झोपेचे वेळापत्रक बदलते
* मानसिक आजार होऊ शकतात
*नैराश्य, भीती
*एकाग्रता कमी होणे
*अति चंचलता
*संताप, चिडचिड
*एकलकोंडेपणा
*डोळ्यांचे नुकसान होऊन दृष्टी कमी होते
* स्थूलता. याची अनेक कारणे आहेत.
*आहाराच्या चुकीच्या सवयी लागणे
*आहाराचे प्रमाण वाढणे
*पचनाच्या तक्रारी
*जाहिराती पाहून जंक फूड खाणे
*मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी होणे
एकंदरीत मोबाईल फोन, संगणक, टॅब यांचा वापर हे सध्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे त्याचा अतिवापर टाळून, आपण त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे.
आता आपण पाहूया की ह्यावर उपाय काय आहेत.
१)मुलांच्या बेडरूम मध्ये टीव्ही किंवा संगणक न ठेवणे
२) मुलांना वेळ ठरवून द्यावी तसेच कोणते कार्यक्रम पहावे हे ठरवून द्यावे. त्याच वेळेत स्क्रीन बघता येईल अशी शिस्त लावणे
३) सलग जास्त वेळ स्क्रीनवर नको असा दंडक घालून देणे.
४) पालकांनी स्वतः स्क्रीन टाईम कमी करणे.
५) मुलांबरोबर सातत्याने संवाद साधणे.
६) पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
७) टीव्ही वा संगणक बघत असताना जेवण करणे टाळावे. त्यावेळी मुलांना खाऊ खायला देऊ नये.
८) कुटुंबातील व्यक्तींनी मिळून काही खेळ खेळावेत.
९) मुलांना कोडी सोडवायला द्यावी.
१०) मुलांना फिरायला घेऊन जावे.
११) मित्र-मैत्रिणी जमवून गप्पा मारणे, खेळ खेळणे याला प्राधान्य द्यावे.
१२) पालकांनी काही ॲप्स वापरून मुलांच्या स्क्रीनचा कंट्रोल स्वतःकडे ठेवावा.
१३) मोबाईल फोन मध्ये काही सेटिंग्स सक्रिय करावीत जेणेकरून एखाद्या विशिष्ट ॲप सोबत घालवण्याचा वेळ नियंत्रि त ठेवता येतो.
१४) किशोरवयीन मुलांना यामधील धोके समजावून सांगावेत व ते स्वतःहून स्क्रीन टाईम कमी करतील असेपहावे. जबरदस्ती करून उपयोग नाही. त्यांच्या वयाला समजेल अशा प्रकारे सांगून फायदा मिळवता येतो.
थोडक्यात स्मार्टफोनचा, “स्मार्ट” वापर करून आपण, आपले व आपल्या मुलांचे जीवन जास्त सुखकर कसे करू शकतो यावि षयी वरील उपाय सुचवले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने हे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. यापेक्षाही काही नाविन्यपूर्ण उपाय असू शकतात, त्यांची चर्चा होणे किंवा सदर माहितीचे आदान-प्रदान होणे सर्वांच्या दीर्घकालीन हिताचे आहे.
Have a healthy screen time!
डॉ. स्मिता कुलकर्णी
स्त्री रोग तज्ज्ञ