Monday, July 27, 2026
Homeदेश विदेशकेरळमधील बेपोर किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला स्फोटानंतर आग; २२ पैकी १८ क्रृ...

केरळमधील बेपोर किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला स्फोटानंतर आग; २२ पैकी १८ क्रृ मेंबर सुरक्षित ४ बेपत्ता

नवी दिल्ली वृत्तंसस्था | New Delhi
केरळच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर शीपचा मोठा अपघात झाला आहे. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या ‘MV WAN HAI 503’ या कंटेनर जहाजात स्फोट झाला. हे जहाज कोलंबो (श्रीलंका) येथून 7 जून रोजी निघाले होते आणि १० जून रोजी मुंबईत पोहोचण्याचे नियोजन होते, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मालवाहू जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोचीपासून सुमारे 315 किमी अंतरावर जहाजाच्या अंडरडेटकमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

सुमारे 270 मीटर लांब व 12.5 मीटर खोल असलेले हे कंटेनर जहाज केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असताना सकाळी 10.30 वाजता जहाजाच्या अंतर्गत भागात (underdeck) स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मुंबई येथील Maritime Operations Centre (MOC) ने कोचीतील त्यांच्या समकक्ष केंद्राला दिली.

स्फोटानंतर बचाव कार्याला युध्दपातळीवर सुरवात करण्यात आली. अपघात होताच घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचे सांगण्यात आले असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या INS Garuda या नौदल विमानतळावरून एक Dornier विमान पाठवण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून हवेतून परिस्थितीचे आकलन करता येईल व आवश्यक मदत समन्वय साधता येईल.

दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, “कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते.”

बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून, जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : पाणी सोडण्याचे नगर-नाशिकचे संकट टळणार

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा काल सायंकाळी 52.74 टक्के इतका झाला. काल...