Friday, May 3, 2024
Homeजळगावमहामार्गावर कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले: एक ठार

महामार्गावर कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले: एक ठार

जळगाव – Jalgaon

भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत समाधान श्रीराम चंदन (वय ३०) गुजरखेडा ता.य़ेवला हा ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महामार्गावर लढ्ढा फार्मजवळ घडली आहे.

- Advertisement -

याबाबत वृत्त असे की, धवल अंबादास बच्छाव आणि समाधान श्रीराम चंदन (दोन्ही राहणार गुजरखेडा, ता. येवला, जिल्हा नाशिक) हे कामानिमित्त दुचाकीवरून भुसावळकडे जात होते. दरम्यान, शहरातून जाणार्‍या महामार्गावरून ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली.

यात समाधान श्रीराम चंदन हा जागीच ठार झाला तर धवल अंबादास बच्छाव हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावर रास्ता रोको

शहरातून जाणार्‍या महामार्गावर अनेक अपघात घडत असतात. गेल्या आठवड्यात याच भागात एका महिलेचा मृत्यू झाला होता.

यानंतर आज एकाचा बळी गेल्याने या परिसरातील रहिवाशांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत महामार्गावर वाहने रोखून ठेवली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस उपअधीक्षकांसह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या कर्मचा यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले व वाहतूक सुरळीत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या