Saturday, May 18, 2024
Homeजळगावमहामार्गावर अपघात; सावद्याचे दोघे ठार

महामार्गावर अपघात; सावद्याचे दोघे ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सावद्याहून जळगाव येथे रुग्णालयात दाखल असलेल्या भाच्याला पाहण्यासाठी येत असलेल्या मामासह त्याच्या मित्राच्या दुचाकीला (two-wheeler) भरधाव वाहनाने धडक (hit by an unidentified vehicle) दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाजवळील नर्सरीजवळ घडली. या अपघातात दुचाकीवरील शेख मेहमूद शेख रज्जाक (वय-50) व राजेंद्र भादू डोळे (वय- 42, दोघे रा. सावदा ता. रावेर) यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावदा येथील शेख मेहमूद शेख रज्जाक यांचा भाचा हा जळगावातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्याला पाहण्यासाठी शेख मेहमूद हे आपला मित्र राजेंद्र डोळे याच्यासोबत दुचाकीने शुक्रवारी सकाळी सावद्याहून जळगावसाठी निघाले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयासमसोर असलेल्या पाटील नर्सरीसमोर समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख मेहमूद व राजेंद्र डोळे या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल

महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान काही वेळानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच मयतांच्या सावदा व जळगावातील नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.

शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेप्रकरणी शून्य क्रमांकाने शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू व अपघाताची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास मनोज इंद्रेकर करत आहेत. दरम्यान, शेख मेहमूद हे मिस्तरी म्हणून काम करत होते तर राजेंद्र डोळे यांचा मेडिकलचा व्यवसाय असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या