Thursday, May 15, 2025
Homeनगरमहामार्गावरील कामाचे 5 लाखांचे साहित्य लंपास

महामार्गावरील कामाचे 5 लाखांचे साहित्य लंपास

करंजी |प्रतिनिधी| Karanji

- Advertisement -

कल्याण – निर्मळ या महामार्गाच्या निवडुंगे व माळीबाभळगाव जवळील पुलाच्या कामाच्या ठिकाणावरील लोखंडी प्लेटा, स्टील व ऑईलइंजिन असे सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महामार्गाचे काम सोलापूर येथील ठेकेदार बाळासाहेब देशमुख यांच्यामार्फत सुरू आहे.

त्यांच्या सुपरवायझर नानासाहेब सुभाष साबळे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनेक अडथळ्यानंतर सध्या महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. परंतु या काम करणार्‍या ठेकेदाराच्या साहित्यावर अज्ञात चोरट्यांची नजर पडली आहे. अशा घटनांमुळे ठेकेदाराच्या कामात अडचणी येत असून अशाच घटना या भागात सुरू आहेत. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...