Thursday, June 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPetrol-Disel Price Hike: देशात महागाईचा भडका; सोन-चांदी, दुधानंतर आता पेट्रोल-डिझेलमध्येही दरवाढ, नाशिकमध्ये...

Petrol-Disel Price Hike: देशात महागाईचा भडका; सोन-चांदी, दुधानंतर आता पेट्रोल-डिझेलमध्येही दरवाढ, नाशिकमध्ये असे आहे दर

नाशिक | Nashik
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना पहाटे ६ वाजता मोठा धक्का दिला आहे. राज्यासह संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. देशातील विविध भागात पेट्रोल ३.१४ रुपये आणि डिझेलचा दर ३.११ रुपयांनी वाढले आहे. तेल कंपन्यांनी मध्यरात्री पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत इमेल करून माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासून (१५ मे) इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

NEET UG 2026 RE-Exam Date: मोठी बातमी! पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEET च्या पुर्नपरिक्षेची नवी तारीख जाहीर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्या तोट्यात चालल्या होत्या. ज्यामुळे आता कंपन्यांनी होणाऱ्या तोट्याची भरपाई करण्यासाठी दरवाढीचे पाऊल उचलले आहे. मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे; ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झाला आहे.

कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढले इंधन
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ₹९७.७७ प्रति लिटर आहे, तर मुंबईमध्ये तो ₹१०६.६४ आणि कोलकातामध्ये ₹१०८.७४ प्रति लिटर नोंदवला गेला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹१०३.९० प्रति लिटर, तर बंगळुरूमध्ये तो ₹१०६.१७ प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त, जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ₹१०८.१९ प्रति लिटर आणि पाटणामध्ये तो ₹१०८.५५ प्रति लिटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलचे असे आहे दर
नाशिककरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर १०४.२२ वरून थेट १०७.९३ प्रति लिटरवर पोहोचला असून ₹3.13 ने वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर ९०.४० वरून ९४.४१ प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे ३.११ रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. पेट्रोल डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे वाहनधारक, सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. इंधन दरवाढीचा परिणाम मालवाहतूक, भाजीपाला तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे.

भारतात तेलाचे दर कोण ठरवतो
भारतात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्या दर ठरवतात. नवीन नियमानुसार, जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतींचा आढावा घेतला जात असे. मात्र आता ‘डेली प्राईस रिव्हिजन’ प्रणालीनुसार, दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि इतर खर्चांचा विचार करून कंपन्या हे दर अपडेट करतात.

ताज्या बातम्या

Bribe News : भूसंपादन नुकसानभरपाई प्रकरणात लाचेची मागणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल...