Sunday, June 14, 2026
Homeदेश विदेशNEET UG 2026 RE-Exam Date: मोठी बातमी! पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEET च्या...

NEET UG 2026 RE-Exam Date: मोठी बातमी! पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEET च्या पुर्नपरिक्षेची नवी तारीख जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार (NEET UG 2026 Re-Exam Schedule) आहे. याबाबत आज एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये पसरले आहे. पेपर फोडणाऱ्या व्यक्तींना नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे.

यंदा देशातील तब्बल २२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी NEET ची परीक्षा दिली होती. मात्र परीक्षेच्या ४८ तास आधी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि यामुळे खळबळ उडाली. ज्यानंतर मंगळवारी, १२ मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता NTA कडून या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून NEET 2026 ची पुनर्परीक्षा २१ जून २०२६ ला होणार आहे.

- Advertisement -

नॅशनल टेस्टिंग लॅबकडून २१ जून २०२६ रोजी NEETची फेरपरिक्षा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आली आहे. ही परिक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याने पुढील परिक्षांचे मात्र वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.

संपादकीय : १५ मे २०२६ – मराठीची ‘अभिजात’ कोंडी

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाउंटवरून या परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये NTA ने लिहिले आहे की, “नीट (यूजी) 2026 — परीक्षेच्या तारखेची घोषणा… नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA), भारत सरकारच्या मान्यतेने, नीट (यूजी) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी केवळ NTA च्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा.” असे सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जोडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न असल्यास ते दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून प्रश्नांचे निरसन करू शकतात.

पेपर फुटी प्रकरणी कारवाई
देशात होणाऱ्या महत्त्वांच्या परीक्षांपैकी एक असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून दिलेली परीक्षाच रद्द झाल्याने खळबळ उडाली होती. ही परीक्षा रद्द झाल्याची घोषणा होताच देशभरातील 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ज्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची वेगवान चौकशी करत महाराष्ट्रातून काही प्रमुख आरोपींना अटक केली.

नीटचा पेपर लीक झाल्यानंतर त्याचे कनेक्शन महाराष्ट्रात देखील सापडले. तपासादरम्यान पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर या शहरांमध्ये या पेपरफुटीचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा पेपर चक्क १५ लाख रुपयांना विकला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वात खळबळजनक माहिती म्हणजे, हा पेपर खुद्द नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या आतूनच फुटल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. एनटीएमधील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे का, याची चौकशी करण्यासाठी आता स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. ज्या यंत्रणेवर देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची जबाबदारी आहे, तिथूनच पेपर फुटल्याच्या वृत्ताने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

IND vs PAK-W : आज भारत-पाकिस्तान महामुकाबला; कशी असेल Playing 11?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Women's T20 World Cup 2026) मध्ये रविवारी (दि.१४) क्रिकेट जगतातील सर्वात मोठी...