Thursday, May 30, 2024
Homeदेश विदेशबस दरीत कोसळून भीषण अपघात; शाळकरी मुलांसह १६ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून भीषण अपघात; शाळकरी मुलांसह १६ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील कुल्लू जिल्ह्यातील (Kullu District) सेंज (Sainj Valley) येथे एक खासगी बस सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.

- Advertisement -

या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. यातील १६ जणांचा मृत्य झाला आहे. मृतांमध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या