Friday, February 6, 2026
HomeनाशिकNashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी विलास...

Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी विलास शिंदेंची निवड

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या १७ व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे.

नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिमगौरी आडके यांची महापौर म्हणून निवड केली तर उपमहापौर म्हणून विलास शिंदेंची निवड केल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी भाजपच्याच महापौरपदाच्या उमेदवार सीमा पवार यांनी माघार घेतली तर उपमहापौर पदासाठी भाजपचे मच्छिंद्र सानप, शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे, राहुल दिवे यांनी मघार घेतली त्यामुळे महापौरपदी हिमगौरी आडके यांची तर विलास शिंदे यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, “आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. मात्र, गुरवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपकडे महापौरपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

YouTube video player

Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर

अशी पार पडली निवड प्रक्रिया
सकाळी ११ वाजता सर्व नगरसेवक सभागृहात दाखल
सकाळी ११.०५ ते ११.२० या दरम्यान नगरसचिवांकडून निवड प्रक्रियेची माहिती दिली गेली.
सकाळी ११.२० ते ११.२५ वाजेदरम्यान निवडणुक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकडून महापौरांच्या निवडीकरीता सभेच्या कामकाजाला सुरुवात.
११.३५ वाजता निवडणुक अधिकाऱ्यांकडून महापौरपदाच्या उमेदवाराच्या अर्जाच्या नावांचे वाचन व छाननी प्रक्रिया पूर्ण करत वैध उमेदवार म्हणून हिमगौरी आडके-आहेर यांच्या नावाची घोषणा
११.४३ वाजता उपमहापौर पदाच्या उमेदवारांची माघार
१२.०० वाजता महापौर उपमहापौरपदी विराजमान

नाशिक महानगर पालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महायुती झाली आहे. महाराष्ट्रात महायुती व देशात एन डी ए म्हणुन आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार यांना प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयामुळे नाशिक म न पा त महायुती झाल्यामुळे माघार घ्यावी लागली आहे.असे जरी असेल तरी आगामी कुंभ मेळ्याच्या दृष्टीने सर्वांनीच एकत्रित येऊन विकासकामे केली पाहिजेत असा आमचा आग्रह राहील. भाजप प्रदेश नेतृत्वाने हा निर्णय घेऊन भाजप मोठा भाऊ म्हणुन सर्वांना बरोबर घेतो व न्याय देतो हे दाखवले आहे. आता आम्ही निवडून आलेल्या सर्व १२२ नगरसेवकांना बरोबर घेऊन नाशिकच्या विकासाकरिता जोमाने कामाला लागु. निवडून आलेल्या महापौर व उपमहापौर यांचे पुनश्च एकदा अभिनंदन.

सुनील केदार.
अध्यक्ष – भाजप नाशिक महानगर जिल्हा.

ताज्या बातम्या

महायुतीची

Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना...

0
नाशिक | प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे....