Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकMSRTC : राज्यात उद्यापासून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’;...

MSRTC : राज्यात उद्यापासून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; विजेत्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उद्या, गुरुवारपासून पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तीन कोटी रुपयांची बक्षिसे वाटण्यात येणार असून राज्यात ‘अ’ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटीचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी येथे दिली.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’चा शुभारंभ आज प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

तसेच “आपलं गाव, आपलं बसस्थानक” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्या अर्थाने बसस्थानक हे त्या गावची शान असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यंयीकरणासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरातील एसटी बस स्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘अ’ वर्ग, निमशहरी ‘ब’ वर्ग आणि ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केली आहे.

सुरुवातीला प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘अ’ वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये, ‘ब’ वर्ग गटातून प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘क’ वर्ग गटातून अव्वल ठरणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...