कोल्हापूर | Kolhapur
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आता त्यांना धमकीचा मेसेज आला असून सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी नव्याने धमकी दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने youtube चॅनेलच्या कॉमेंटमधून धमकी दिली आहे.
नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने चार दिवसापूर्वी इंद्रजीत सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावरून गदारोळ माजलेला असतानाच आणि संशयित कोरटकर यांच्या शोधासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असताना आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने धमकाविण्यात आले आहे.
शुक्रवारी ( 28 फेब्रुवारी ) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने सावंत यांना दिली आहे.
फार काही दिवस नाही….पण लवकरच घरात घुसून इंद्रजीत सावंत यांचा खात्मा केला जाईल…. असे त्यात म्हटले आहे. या धमकीमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इंद्रजीत सावंत यांनी दुपारी वकिलांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
प्रशांत कोरटकर अद्याप फरार
इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर तो मी नव्हेच असा दावा करणारा प्रशांत कोरटकर फरार का झाला? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात कोरटकरच्या घरात पाहणी करून माग काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. तो मध्य प्रदेशातील बालाघाटला फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झालं आहे. धमकी मी दिली नाही म्हणणाऱ्या कोरटकरने अटकपूर्व जामीनासाठी पळापळ सुरु केल्याचे बोलले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा