Thursday, June 13, 2024
Homeनगरहिवरगाव पठार येथे पाच जणांना गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

हिवरगाव पठार येथे पाच जणांना गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

तालुक्यघतील हिवरगाव पठार येथे पाच जणांपैकी दोघांना कुर्‍हाडी व लाकडी दांड्याने तर उर्वरित तिघांना दगडाने व काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की गौतम विष्णू भालेराव (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांची बहीण कविता नितीन मिसाळ यांचे जावेबरोबर भांडण झालेले होते. या कारणावरुन गैरकायद्याने जमाव गोळा करुन गौतम भालेराव व जितेंद्र भालेराव यांना विलास मिसाळ, एक तरुण व मंदा विलास मिसाळ यांनी शिवीगाळ व दमदाटी करुन कुर्‍हाडी व लाकडी दांड्याने मारहाण करत गंभीर जखमी केले.

तर सोनाबाई मिसाळ, वैशाली विजय मिसाळ, दोन तरुण यांनी आई सुमन विष्णू भालेराव, बहीण कविता नितीन मिसाळ व मेहुणा नितीन रामू मिसाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी आणि दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी जखमी गौतम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सात आरोपींवर घारगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. आर. व्ही. भुतांबरे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या