संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील हिवरगाव पावसा (टेमगिरे वस्ती) (Hiwargaon Pawasa) येथे घास कापण्यासाठी शेतात जाणार्या महिलेवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack On Woman) करत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.1) सायंकाळी घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे पसरले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, की हिवरगाव पावसा येथे संदीप टेमगिरे हे राहत आहे. त्यांची पत्नी अर्चना टेमगिरे या शनिवारी सायंकाळी शेतात घास कापण्यासाठी जात असताना त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने (Leopard) त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. तेव्हा बिबट्याने धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने (Forest Department) घटनास्थळी धाव घेतली.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आली आहे. सध्या या महिलेवर संगमनेर (Sangamner) शहरातील कुटे हॉस्पिटमध्ये औषधोपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील या परिसरात बिबट्याचे हल्ले झालेले आहेत. त्यामुळे वन विभागाने (Forest Department) ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.




