Sunday, November 10, 2024
Homeनगरहोमगार्डची 28 ऑगस्टपासून कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी

होमगार्डची 28 ऑगस्टपासून कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी

नवीन सदस्य नोंदणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा होमगार्डमधील विविध पदांच्या रिक्त असलेल्या नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जान्वये नोंदणी केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व मैदानी चाचणीसाठी दिनांकनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी वेळापत्रकाप्रमाणे येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित रहावे, असे जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी कळविले आहे.

- Advertisement -

28 ऑगस्ट रोजी पुरूष अर्ज नोंदणी क्र. 1 ते 2 हजार (महिला उमेदवार वगळुन), 29 ऑगस्ट रोजी पुरूष अर्ज नोंदणी क्र. 2001 ते 4000 (महिला उमेदवार वगळुन), 30 ऑगस्ट रोजी पुरूष अर्ज 4001 ते 6000 (महिला उमेदवार वगळुन), 31 ऑगस्ट रोजी पुरूष अर्ज 6001 ते 8000 (महिला उमेदवार वगळुन) व 2 सप्टेंबर रोजी नोंदणी अर्ज क्र. 8001 ते उर्वरित पुरूष व सर्व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे. वरील सर्व तारखांना सकाळी 6 ते 10 या वेळेत प्रवेश दिला जाईल.

याबाबत विस्तृतपणे माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्डमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेस नोंदणी अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही नोंदणी केवळ नगर जिल्ह्यासाठीच करण्यात आलेली असून बाहेरील जिल्ह्यातील नोंदणी अर्ज बाद करण्यात आले असल्याने अशा उमेदवारांनी उपस्थित राहू नये, संबंधित उमेदवार नियोजित दिनांकास उपस्थित न राहिल्यास पुन्हा संधी देण्यात येणार नसल्याचेही खैरे यांनी कळविले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या