Monday, May 27, 2024
Homeनगरघरातून 55 तोळ्यांचे दागिने लांबविले

घरातून 55 तोळ्यांचे दागिने लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्टेशन रस्त्यावरील आनंदऋषी हॉस्पिटलजवळ असलेल्या डॉ. ऋषभ फिरोदिया (वय 47) यांच्या अरिहंत बंगल्यातून सुमारे 55 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, डायमंड व हिर्‍यांचे दागिने तसेच 25 हजारांची रोकड व घड्याळ असा 12 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते 28 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी डॉ.फिरोदिया यांनी शनिवारी (दि. 28) रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून काही संशयितांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, असे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. डॉ.फिरोदिया हे 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आई आजारी असल्याने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले होते. दरम्यान, डॉ.फिरोदिया त्यांचे घड्याळ विसरल्याने त्यांनी दवाखान्यातून परतल्यानंतर शोकेसमध्ये घड्याळ पाहिले असता त्यांना घड्याळ मिळून आले नाही व त्यांनी शोकेस जवळील बॅगमध्ये ठेवलेली 25 हजार रुपयांची रोकड पाहिली असता त्यांना ती निदर्शनास आली नाही.

घरगुती कामासाठी असलेल्या चार महिलांकडे डॉ. फिरोदिया यांनी चौकशी केली असता त्यांना घड्याळ व रोकड बाबत काहीही माहिती नसल्याने सांगितले. डॉ. फिरोदिया यांनी थेट 28 ऑक्टोबर रोजी पुन्हा घड्याळ व रोकडचा घरामध्ये शोध सुरू केला असता त्यांना बेडरूममधील कपाटातील लॉकरचा दरवाजा उघडा दिसून आला व त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. डॉ. फिरोदिया यांनी दागिन्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांना दागिने मिळून आले नाहीत. त्यानंतर डॉ. फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या