Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याकेंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री...

केंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री शाहांची माहिती

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या लडाखमध्ये (Ladakh) पाच नवीन जिल्हे तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टीकोनाशी हा निर्णय सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. या निर्णयामुळे येथील लोकांना सरकारी योजनांचा लाभ देणे सोपे होणार असून मोदी सरकार लडाखच्या नागरिकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे शाह ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : विशेष मुलाखत : दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024

हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा! ठाकरे गट-भाजप आमनेसामने

दरम्यान, ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला होता. तर दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले होते. तसेच केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (Union Ministry of Home Affairs) थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...