Saturday, November 16, 2024
Homeशैक्षणिकगोरिल्ला स्ट्रॅटजीचे अनुकरण करा.!

गोरिल्ला स्ट्रॅटजीचे अनुकरण करा.!

बहुतांश बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक मंडळी रिज्यूमे जॉब पोर्टलवर अपलोड करतात. मात्र अनेकांना त्याचे कॉल्स येत नाहीत. नोकरी मिळवण्यासाठी कॉल येणे अत्यावश्यक आहे. परंतु कॉल्स न आल्याने कोठेतरी पाणी मुरतेय असेच म्हणावे लागेल. त्याचा शोध घ्यायला हवा. कॉल्स न येण्याचे कारणे अनेक असू शकतात. उदा. रिज्यूमे योग्य नसणे, शैक्षणिक पात्रतेचा अचूक उल्लेख नसणे, पात्रतेनुसार योग्य ठिकाणी अर्ज न करणे, ज्या ठिकाणी आपण अर्ज करतो, तेथे मोठ्या संख्येने अर्ज येणे आदींमुळे उमेदवाराला कॉल येत नाहीत. त्यामुळे कॉल्स येण्यासाठी काही गोष्टींचे आकलन करावे लागेल. या आधारावर आपल्याला कॉल्स येण्यास सुरवात होईल.

प्रोफाइल अपडेट करा :
सर्वात पहिले काम म्हणजे चांगल्या रितीने रिज्यूमे तयार करणे. रिज्युमे मध्ये कोणतिही चूक राहणार नाही यासाठी दोन तीन जणांकडून रिज्यूमे तपासून घ्या. याशिवाय चांगल्या जॉब पोर्टल्सवर प्रोफाइल तयार करा आणि नंतर रिज्यूमे अपलोड करा. प्रोफाइलमध्ये पात्रता आणि कौशल्याची माहिती अचूक भरा. प्रोफाइल तयार करताना कौशल्याला अधोरेखित करा.प्रोफाइल तपासणार्‍यांचे लक्ष वेधले जाईल, अशा ठिकाणी कौशल्याचा उल्लेख करावा. कारण कंपन्या सतत नवीन कर्मचार्‍यांचा शोध घेत असतात. त्यांना कुशल उमेदवार हवे असतात आणि तसा शोध ते आपल्या रिज्यूमेमधून घेत असतात. याचाच अर्थ कौशल्याचा उल्लेख रिज्युमेमध्ये आघाडीवर करावा. प्रत्येक जॉब पोर्टल्सवर आपले प्रोफाइल सर्वात वर राहिल याची काळजी घ्या. यासाठी तीन गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. आपला प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण असणे, कौशल्यासाठी योग्य जागेची निवड आणि दररोज प्रोफाइलला अपडेट करत राहणे. म्हणूनच रिज्यूमेमध्ये बदल करत राहिल्यास कॉल येत राहतील.

- Advertisement -

रिक्त जागांचे आकलन करणे :
प्रत्येक जॉब पोर्टलवर रिज्यूमे अपलोड केल्यानंतरही कॉल येत नसतील तर गोरिल्ला स्ट्रॅटजीचे अनुकरण करायला हवे. या स्ट्रॅटजीनुसार जेवढ्या चांगल्या कंपन्या आहेत, त्याची निवड करावी आणि नंतर त्यांच्या संकेतस्थळावर जावून करियर सेक्शनमध्ये जावून रिज्यूमे अपलोड करावा. एवढेच नाही तर संबंधित कंपनीच्या एचआर विभागाला फोन करुन रिक्त जागांची माहिती देखील मिळवू शकता. गरज भासल्यास स्वतंत्रपणे कंपनीला बायोडेटा देखील पाठवू शकतात. यामुळे आपल्याला कॉल्स येण्यास प्रारंभ होईल. अनेकदा कंपन्यांकडून जागांची जाहिरात दिली जात नाही. काही वेळी वैयक्तिक ओळखीवरून कॉल्स पाठविले जातात किंवा कौशल्यप्राप्त व्यक्तीला कॉल केला जातो. अशा स्थितीत आपण अर्ज करत असाल तर तेथे यश मिळवण्याची शक्यता अधिक राहते.

नेटवर्क वाढवा, संवाद कौशल्यात सुधारणा :
गोरिल्ला स्ट्रॅटजीचे अनुकरण केल्यानंतर व्यावसायिक नेटवर्क वाढवायला हवे. आपले भाऊ- बहिण, नातेवाईक, मित्र, मित्राचे मित्र आदींशी नोकरीच्या संधीविषयी चर्चा करत राहा. एखाद्याच्या सल्ल्यावरून नोकरीची संधी देखील उपलब्ध होऊ शकते. सोशल मीडियाचा देखील नोकरी मिळवण्यासाठी प्रभावीपणे वापर करु शकता. फेसबुक आणि ट्विटरवर अनेक कंपन्या वॉक इन इंटरव्यूह, जॉब फेअरसंदर्भात पोस्ट करत असतात. दिल्ली, बंगळूर यासारख्या मोठ्या शहरात सतत वॉक इन इंटरव्यूह सुरू असतात. अशा स्थितीत फेेसबुक पेज खूपच उपयुक्त ठरते. जॉबशी निगडीत पेजला लाइक करावे आणि लिंकडेनसारख्या संकेतस्थळाच्या मदतीने कंपन्यांच्या संपर्कात राहवे. जॉब सर्च करताना काही वेळा अचानक मुलाखतीचा कॉल येऊ शकतो. त्यामुळे आपण मुलाखतीसाठी नेहमीच तयार राहिले पाहिजे. आपण संवाद कौशल्यात सतत सुधारणा करायला हवी. मुलाखतीत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे आकलन करण्यासाठी इंटरनेटची मदत घ्या. या प्रश्‍नांची उत्तरे देताना आरशासमोर उभे राहा. त्यामुळे देहबोली लक्षात येईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या