मुंबई | Mumbai
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये (N.D. Studio) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करत वयाच्या ५८ व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या आत्महत्येमुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे…
Nitin Desai Death : ‘असा’ होता नितीन देसाईंचा जागतिक दर्जाच्या कलाकारापर्यंतचा प्रवास
ज्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली तो एनडी स्टुडिओ गेल्या काही महिन्यांपासून वादात होता. स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते असे म्हटले जात असून याच नामुष्कीने नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देसाईंचा एनडी स्टुडिओ नेमका आहे तरी कसा? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
नितीन देसाईंनी २००५ मध्ये मुंबईजवळील कर्जत (Karjat) येथे ५२ एकरात भव्य असा एनडी स्टुडिओ उभारला होता. कर्जत हे मुंबईपासून (Mumbai) ६५ किमी अंतरावर असून गेल्या कित्येक वर्षांपासून हे ठिकाण बॉलिवूडचे नव्हे तर सर्वांचेच आवडते शूटिंग डेस्टिनेशन आहे. तसेच २१ हेक्टरमध्ये पसरलेला हा स्टुडिओनंतर रिलायन्स एंटरटेनमेंटने ५० टक्के हिस्साने जवळपास १.५० अब्ज रुपयांना विकत घेतला. त्यानंतर या सेटवर पहिल्यांदा ‘राजा शिवछत्रपती’ या मराठी मालिकेसह टीव्ही मालिका निर्माण करण्यास सुरुवात केली.
सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
नुकतेच एनडी स्टुडिओला २० वर्ष पूर्ण झाली असून या स्टुडिओमध्ये आजवर नितीन देसाई यांनी १९८ हून अधिक चित्रपट २०० हून अधिक टेलिव्हिजन मालिका आणि ३५० हून अधिक गेम शोसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच स्टुडिओमध्ये २५ हजार फुटांचा एक विशाल डायनोसॉर फ्लोर, प्रॉप्स चेंबर आणि रॉयल पॅलेस, किल्ले, शहर, गावांचे ग्रँड लोकेशन्स आहेत. त्यामुळे या भव्य सेटला भारतातील पहिले थीम पार्क म्हटले जाते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Haryana Violence : हरियाणात दुसऱ्या दिवशीही हिंसाचार, मृतांचा आकडा वाढला; ‘त्या’ व्हिडीओमुळे तणावजन्य स्थिती?