Monday, May 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHSC Result 2025 : संतोष देशमुखांच्या लेकीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश; मिळविले...

HSC Result 2025 : संतोष देशमुखांच्या लेकीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश; मिळविले ‘इतके’ टक्के

मुंबई | Mumbai

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामुळे बीडसह (Beed) राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर (Family) दु:खाचा डोंगर कोसळला होता.

- Advertisement -

वडिलांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुखांची कन्या वैभवी (Vaibhavi Deshmukh) देशमुख आपले चुलते धनंजय देशमुखांसोबत राज्यभर फिरत होती. तिने महाराष्ट्रभर (Maharashtra) आंदोलने केली, अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते, अशा कठीण परिस्थितीत तिने अभ्यास करुन बारावीच्या परीक्षेत (HSC Result 2025) घवघवीत यश मिळवून दाखवले आहे.

बारावीच्या परीक्षेचा (HSC Results) ऑनलाईन निकाल आज (सोमवारी) दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. यात इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितामध्ये ९४, फिजिक्समध्ये ८३, केमेस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजीमध्ये ९८ गुण मिळाले आहेत. वैभवीला एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळाले आहेत.

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी 

इयत्ता बारावीच्या (HSC Exam) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल (Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यात राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. तर राज्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९४.५८ टक्के आणि मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

येथे निकाल पाहता येणार

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक, जबाबदारी घेतो; राहुल...

0
दिल्ली । Delhi रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. ब्राऊन विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात एका शीख तरुणाने ऑपरेशन...