नाशिक | Nashik
इयत्ता बारावीच्या (HSC Exam) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल (Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यात राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. तर राज्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९४.५८ टक्के आणि मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.
विद्यार्थ्यांना (Student) दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. राज्यात कोकण विभागाचा (Kokan Division) ९६.९४ टक्के सर्वाधिक निकाल लागला असून, सर्वात कमी लातूर विभागाचा (Latur Division) निकाल ८९.४६ टक्के इतका लागला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागाचा निकाल ९१.३१ टक्के असून, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नाशिक विभागात (Nashik Division) एकूण ०१ लाख ५८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ०१ लाख ५७ हजार ८४२ विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामधील ०१ लाख ४४ हजार १३६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिकचा (Nashik) सातवा क्रमांक आहे.
दरम्यान, यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत सुरळीत पार पडली होती. यामध्ये राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाखांहून अधिक
बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ इतकी आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९.९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. तर ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ इतकी आहे.
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?
कला- ८०.५२ टक्के
वाणिज्य- ९२.६८
विज्ञान- ९७.३५ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३ टक्के
आयटीआय- ८२.०३ टक्के
विभागनिहाय निकाल
कोकण – ९६.७४ टक्के
कोल्हापूर -९३.६४ टक्के
मुंबई -९२.९३ टक्के
संभाजीनगर – ९२.२४ टक्के
अमरावती – ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
पुणे – ९१.३२ टक्के
नागपूर -९०.५२ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के
येथे निकाल पाहता येणार
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा पाहायचा?
* सर्वांत आधी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
* होमपेजवर ङ्गमहाराष्ट्र एसएससी / एचएससी निकाल २०२५फलिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
* क्लिक करताच नवीन विंडो उघडेल, त्या ठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. सोबत आईचे नाव भरुन सबमिट बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकालाची प्रत डाऊनलोडही करता येईल.