Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपत्नीकडून पतीची हत्या

पत्नीकडून पतीची हत्या

अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा तपास

अंबासन । वार्ताहर Ambasan

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील कैलास जिभाऊ पवार (45) या युवकाच्या खुनाचा तपास लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तपास करून अवघ्या सहा तासात उलगडा केला असून खुनाच्या आरोपाखाली मयताच्या पत्नीस अटक केली आहे.

YouTube video player

दरेगाव येथील आदिवासी वस्तीत राहणारा कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह घराच्या पाठी मागील नाल्यात आढळून आला होता. या संदर्भात येथील पोलीस पाटलाने जायखेडा पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी माहिती मिळताच आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीरसिंग संधू, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी तपास चक्र वेगात फिरवीत गुप्त माहितीच्या आधारे मयताच्या पत्नीची कसून चौकशी केली. यात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून सतत होणार्‍या मारहाणीस वैतागून पत्नी मनीषा कैलास पवार हिने दोरीच्या साहाय्याने पतीस गळा आवळून ठार मारले व त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पंढरीनाथ भैया सोनवणे (रा. घोडदस, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या फिर्यादीवरून संशयित मनिषा पवार वर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक चेडे, पो.ह. शेरे, बच्छाव, पो.ना. गोविंद, शिरसागर, जाधव, मोरे, पाडवी, अरुण वनसे, पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ह. सुभाष चोपडा, श्याम पवार, सचिन वराडे, दत्तात्रय माळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...