Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसर्पदंश झालेल्या पत्नीला वाचविण्यासाठी पतीने खांद्यावर नेत पुराच्या पाण्यातून काढली वाट

सर्पदंश झालेल्या पत्नीला वाचविण्यासाठी पतीने खांद्यावर नेत पुराच्या पाण्यातून काढली वाट

पूल मंजूर करण्याची ग्रामस्थांची मागणी

- Advertisement -

घोटी | जाकीर शेख

इगतपुरी तालुक्यात गत आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असल्याने अवघ्या पाच दिवसात तालुक्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत अश्याच पावसाळी वातावरणात इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी टाकेद हद्दीतील चिखलदरा वस्ती मध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी सुनील आंबेकर यांच्या पत्नी अश्विनी आंबेकर यांना पहाटे सहा वाजेच्या दरम्यान सर्पदंश झाला.

सर्प दंश झालेल्या अश्विनी आंबेकर यांना पत्नीला पायी घेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना चिखलदरा वाडी रस्त्यामधील सर्व ओहळ नद्या नाल्यांना प्रचंड पूर आलेला होता चिखलदरा धोंगडे वस्तीतील रस्त्याला पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून पलीकडे रस्ता ओलांडणे कठीण होते यामुळे सर्प दंश झालेल्या त्यांच्या पत्नी अश्विनी आंबेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी उशीर होत होता व उशीर होत असल्याने त्यांच्या शरीरात विष आणखी भिंनत चालले होते.

यानंतर त्या बेशुद्ध पडल्या अश्या कठीण परिस्थितीत परिस्थितीशी दोन हात करत प्रसंगवधान राखताच सुनील आंबेकर यांनी आपल्या बेशुद्ध अवस्थेतील पत्नीला खांद्यावर घेत एक जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत भर पावसात पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत चिखलदरा वाडीतून सोनोशी गाव गाठले.त्यानंतर तात्काळ गाडीतुन घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी आठ वाजे दरम्यान उपचारासाठी दाखल केले.

सर्प दंश झालेल्या बेशुद्ध अवस्थेतील अश्विनी आंबेकर यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन घोटी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ एस डी सदावर्ते व स्त्री रोग तज्ञ डॉ राहुल वाघ यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ उपचार चालू केले व अँटी व्हॅनम इंजेक्शन देऊन अंडर ओब्सरवेशनमध्ये उपचार चालू ठेवले.ही माहिती सुनील आंबेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांना सांगितली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत राम शिंदे यांनी मी स्वतः रुग्णालयात येतो असा आधार दिला.या संपूर्ण कालावधीत आंबेकर कुटुंबीय व अश्विनीचे आई वडील यांचा जीव भांड्यात पडला होता सर्व ताणतणावमध्ये चिंताग्रस्त असतांना डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 1 वाजेच्या दरम्यान सर्प दंश झालेल्या अश्विनी आंबेकर या शुद्धीवर आल्या हे बघताच सर्व सुनील आंबेकर व कुटुंब व अश्विनीचे आई वडीलांनी मोकळा श्वास सोडला.व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

अश्यातच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी आपल्या मित्र परिवारासह घोटी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली व सर्प दंश झालेल्या अश्विनी आंबेकर व सुनील आंबेकर व सर्व डॉक्टर टीम यांची भेट घेत या घटनेबद्दल सविस्तर आढावा घेतला व सर्व डॉक्टर कर्मचारी यांचे आभार मानले.दरम्यान भर पावसात पुराच्या पाण्यातून पत्नीला वाचविण्यासाठी पत्नीला खांद्यावर घेत आपल्या जीवाची बाजी लावत रस्ता ओलांडून सुनील आंबेकर यांनी मोठी हिम्मत केल्याने त्यांच्या पत्नीचे आम्ही प्राण वाचवू शकलो असे घोटी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

सोनोशी येथून एक कि.मी. अंतरावर असलेल्या चिखलदरा धोंगडे वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने या भागातील जवळपास तीस शेतकरी कुटुंबियांची पुलावाचवून मोठी गैरसोय होते आहे केवळ रस्त्यावर पूल नसल्याने या वस्तीतील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ वृद्ध महिला ग्रामस्थांना रात्री अपरात्री ओहळातील पाण्यातून मार्गक्रमण करत जीव धोक्यात घालत गावाकडे ये जा करावी लागते आहे. या रस्त्यावरील पुलासाठी अनेकदा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे मागणी केली परंतु अद्यापपर्यंत चिखलदरा वाडी रस्त्यावरील पूल प्रश्न काही सुटला नाही परिणामी केवळ पूल नसल्याने येथील ग्रामस्थांची आजही मोठी गैरसोय होत आहे जर या ठिकाणी पूल झाला असता तर सर्प दंश झालेल्या अश्विनी आंबेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर झाले असते तरी प्रशासनाने या रस्ता व पूल प्रश्न बघावा व सोडवावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

“पूल नसल्यामुळे पत्नीला खांद्यावर घेऊन कंबराएवढ्या ओहळतील पुराच्या वाहत्या पाण्यातुन रस्ता ओलांडून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जर पुलाची सुविधा झाली तर असा जीवघेणा संघर्ष कायमचा थांबेल तरी प्रशासनाने लक्ष द्यावे.”
– सुनील आंबेकर शेतकरी ग्रामस्थ चिखलदरा धोंगडे वस्ती सोनोशी

“सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळ वाया न घालवता व कुठेही न हलवता तात्काळ १०८ टोल फ्रीवर संपर्क करून तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे,शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधक सर्प लस सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध असतात यामुळे अनेकांचे प्राण वाचतात.”
– डॉ एस डी सदावर्ते
वैद्यकीय अधीक्षक घोटी ग्रामीण रुग्णालय

“सुनीलने पत्नी अश्विनीचे प्राण वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावत पत्नीला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने आज तात्काळ उपचार करत अश्विनीचे प्राण वाचवू शकलो.शासकीय रुग्णालयात सर्व सेवा उपलब्ध असतात”
– डॉ राहुल वाघ स्त्री रोग तज्ञ घोटी ग्रामीण रुग्णालय

- Advertisment -

ताज्या बातम्या