Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : प्रेमप्रकरणास नकार दिल्याने पतीच्या मित्राने केला विनयभंग

Nashik Crime News : प्रेमप्रकरणास नकार दिल्याने पतीच्या मित्राने केला विनयभंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पतीच्या मित्रानेच विवाहितेचा विनयभंग (Molested) केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणास (Love Affair) नकार व धमकी दिल्याने संशयिताने फोनवर (Phone) शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय पगारे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रविशंकर मार्गावरील खोडेनगर भागात राहणाऱ्या पीडितेने फिर्याद दाखल केली आहे. संशयित (Suspect) व तक्रारदार महिला एकमेकांचे परिचीत असून, तो पतीचा मित्र आहे. महिलेचा पती व संशयित या दोघा मित्रांमध्ये मे २०२४ मध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याने तो पीडितेच्या संपर्कात आला. महिलेचा मोबाईल नंबर घेत त्याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

हे देखील वाचा : पखाल रोडवर महाकाय वृक्ष कोसळला

वेळोवेळी फोन व चॅटींग करून त्याने व्यवहार पूर्ण होईल तो पर्यंत माझ्या संपर्कात रहा नाही तर पतीचे हात पाय तोडील अशी धमकी त्याने महिलेस दिली होती. त्यामुळे महिला फोन उचलत होती. गेल्या ११ जून रोजी दुपारच्या सुमारास संशयिताने फोन करून तू मला आवडतेस माझ्याशी रिलेशनमध्ये रहा अशी विनवणी केली असता महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने महिलेस (Woman) शिवीगाळ केली व आपले काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक काकुळते करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या