Sunday, May 26, 2024
Homeक्रीडाआयपीएल १३ : पहिल्या विजयासाठी हैद्राबाद-कोलकाता सज्ज

आयपीएल १३ : पहिल्या विजयासाठी हैद्राबाद-कोलकाता सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएल स्पर्धेचा आठवा सामना सनराईझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज अबुधाबी येथे होत आहे.

- Advertisement -

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी आपला सलामी सामना गमावला असून, दोन्ही संघ स्पर्धेतील आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी सज्ज आहेत.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १७ सामने झाले आहेत. यात कोलकात्याने १० तर हैदराबादने ७ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये म्याचविनर खेळाडू असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी आशा आहे.

हैद्राबाद संघाच्या फलंदाजीची मदार डेविड वॉर्नर, जॉनी बेरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, वृद्धिमान सहा यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलूंमध्ये मिचेल मार्श, मोहंमद नबी, रशीद खान हे पर्याय आहेत. गोलंदाजीत बिली स्टॅन्लेक, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमर, फेबिअन अलेन, रशीद खान आहेत.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या