आसाम | Assam
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना जनताच आपले सर्वकाही आणि “रिमोट कंट्रोल” आहेत आणि त्यांच्यासमोरच ते त्यांच्या वेदना व्यक्त करतात असे म्हटंले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदींवर झालेल्या आक्षेपार्ह टीकेवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूरला जबरदस्त यश मिळाले. “मी भगवा न शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून टाकतो.”
नेमकं काय म्हणाले मोदी?
“मला माहित आहे, संपूर्ण काँग्रेस व्यवस्था मला लक्ष्य करेल आणि म्हणेल की मोदी पुन्हा रडत आहेत. जनता माझा देव आहे; जर मी त्यांच्यासमोर माझे दुःख व्यक्त केले नाही तर मी ते कुठे करणार? ते माझे स्वामी आहेत, माझे देवता आहेत आणि माझे रिमोट कंट्रोल आहेत. माझ्याकडे दुसरे कोणतेही रिमोट कंट्रोल नाही,” असे त्यांनी आसामच्या दरंग येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर एका सभेत सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. भूपेन हजारिका यांचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले, काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणे, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती. आसामच्या महान पुत्रांनी आणि पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. “ज्या दिवशी भारत सरकारने भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिले, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षांनी मोदी “नाचणाऱ्या आणि गाणाऱ्यांना” भारतरत्न देत आहेत, असे म्हणत त्यांचा अपमान केला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, हे विधान आसाम आणि तेथील लोकांच्या योगदानाचा अपमान करणारे आहे.
त्यांच्या वक्तव्यामुळे आजही लोकांच्या जखमा भरलेल्या नाही
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, १९६२ साली चीनसोबत युद्ध झाले होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या वक्तव केले. त्यांच्या वक्तव्यामुळे आजही ईशान्य राज्यात राहणाऱ्या लोकांच्या जखमा भरलेल्या नाहीत. त्यात काँग्रेसची पीढी त्या जखमांवर मीठ चोळत आहे.
मला कितीही शिव्या द्या मी भगवान शिव यांचा भक्त आहे
पंतप्रधान म्हणाले, “मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून घेतो. पण जेव्हा दुसऱ्याचा अपमान होतो, तेव्हा मी गप्प राहू शकत नाही.” भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य होता की नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी जनतेला विचारला. एवढेच नाही, तर देशातील जनता माजी मालक आहे, असेही ते यावेली म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





