Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक आयोगाचा निर्णय मला मान्य नाही- उद्धव ठाकरे

निवडणूक आयोगाचा निर्णय मला मान्य नाही- उद्धव ठाकरे

खेड | वृत्तसंस्था Khed

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते नारायण राणे यांचं वर्चस्व असलेल्या कोकणात झाली. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेसाठी कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी बघायला मिळाली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आणलेले आहेत. हो मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव देऊ शकतं. पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत.

शिवसेनाप्रमुख यांच्या मागे उभे राहिले नसते तर आज हे कुठे राहिले असते? पण एवढं निष्ठुर आणि निर्घृणपणाने वागत आहेत की, ज्याने सोबत दिली त्यांना पहिले संपविण्याच्या मागे लागले आहेत. तोफा या देशद्रोह्यांविषयी वापरायच्या असतात.शिवसेना ही आपली आई आहे. दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केला आहे.शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आज सुद्धा दोन-तीन तोफा गडाडल्याच ना. भास्कर जाधव, गिते आहेत, सुषमा अंधारे आहेत. संजय कदम आता आणखी एक तोफ आपल्यासोबत आलेली आहे.असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या