Friday, May 17, 2024
Homeजळगावगद्दारांचा मुखवटा फाडण्यासाठीच धरणगावात : माजी मंत्री आदित्य ठाकरे

गद्दारांचा मुखवटा फाडण्यासाठीच धरणगावात : माजी मंत्री आदित्य ठाकरे

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी) :

शिवसेनेशी गद्दारी (Betrayal of Shiv Sena) करणारे गद्दार बंड आणि उठावाच्या वल्गना (Insurrection) करीत आहेत. त्यांचा मुखवटा फाडण्यासाठीच (tear off the mask) मी धरणगावी आलो आहे. गद्दारीच्या दडपणाने आणि आमिषाला बळी (fall prey to the bait) पडलेले या फुटीर आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले आहेत. राज्यात सध्या घाणेरडे राजकारण (Dirty politics) सुरु आहे. या राजकारणाने महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती खराब (Bad political culture) केलेली आहे.

- Advertisement -

वैयक्तिक स्वार्थासाठी चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भल्या कडे पाठ फिरवली आहे. ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सर्व गद्दारांना धडा शिकवायचा (teach the traitors a lesson) आहे असे आव्हान माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी केले. ते येथील शिवाजी महाराज स्मारकाजवळ आयोजित संवाद यात्रेच्या (Samvad Yatra) सभेत ते बोलत होते. अर्ध्या तासाच्या सुसंस्कृत भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. सभेला शिवसैनिकासह नागरीकांची ऐतिहासिक, प्रचंड गर्दी होती.

या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, जीवनसिंह बायास, माजी पंचायत समिती सभापती दीपक सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य जानकीराम पाटील, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ , नगरसेवक वासुदेव चौधरी, अहमद पठाण ,भागवत चौधरी, धीरेंद्र पूर्भे, राजेंद्र ठाकरे, देवा महाजन, जळगाव येथील विराज कावडीया, मनिषाताई परब ,मंगलाताई बारी ,रचनाताई पाटील, ॲड. शरद माळी, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री ठाकरे म्हणाले, बॅनर फाडणाऱ्यांकडे लक्ष देवू नका, ते चिंधी चोर आहेत. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान आहे, ही भूमिका आपल्याला महाराष्ट्राला पटवून द्यायची आहे. यासाठी आपले प्रेम आशीर्वाद घ्यायला मी आलेलो आहे. राज्यात शेतकरी समस्याग्रस्त आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, ओला दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मागण्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. राज्य सुरक्षित नाही. सध्या असलेले सरकार घटनाबाह्य सरकार आहे. ते औटघटकेचं आहे. केव्हाही कोसळणार आहे. गद्दारांनी शिवसेना संपवण्याची घाट रचला आहे

. मात्र, सर्वसामान्य नागरिक जोपर्यंत सेनेच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत हे होणार नाही, याची जाणीव गद्दारांनी ठेवावी. शिवसेनेच्या नावावर आणि शिवसैनिकांच्या मतावर निवडून आलेल्यांनी, हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा. पुन्हा निवडून यावे. असे आव्हान त्यांनी केले. शिवसेनेने जातीपातीत ,धर्मात कधीही कोणताही वाद निर्माण केला नाही आणि करणार देखील नाहीत.

अडीच वर्षाच्या काळामध्ये महा विकास आघाडीच्या सरकारने, राज्याला पुढं आणण्यासाठी खूप काम केले. कोविड च्या काळात देशातच नव्हे, तर जगभरात महाराष्ट्र शासनाचे नाव घेतले गेले. ही चांगली प्रगती विरोधकांना सहन झाली नाही. म्हणून, सरकार पाडले. मात्र, आता शिवसेनेच्या गद्दारांना, त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आपलं प्रेम आणि आपली उपस्थिती, त्यांना त्याची जागा नक्कीच दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कठीण प्रसंगी आपण आम्हाला सांभाळून घेणार ना ? असे भावनिक साद आदित्य ठाकरे यांनी घातल्यावर उपस्थितांनी जोरदार सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी श्री ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना भरभरून दाद दिली. नागरिकांनीदेखील आपल्या मनातला रोष बोलून दाखवला. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नाशिकचे कारभारी आहिरे, धानोरा येथील संतोष सोनवणे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, बांभोरी येथील हेमंत सपकाळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, अड. शरद माळी, अमळनेर येथील विजय पाटील, पष्टाने येथील नाना ठाकरे, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, रचना ताई पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रोकडे, किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या