मुंबई । Mumbai
महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी (IAS Officer) अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Transfer) यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.
विकास आयुक्त, असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली.
हे देखील वाचा : अमित शहांना ‘शेअर मार्केट’बाबत केलेले ‘ते’ वक्तव्य भोवणार?
विशेष म्हणजे तुकाराम मुंडे यांची १९ वर्षांच्या कारकीर्दितील २२ वी बदली आहे. आता, पुन्हा एकदा त्यांनी बदली करण्यात आली आहे. जून २०२३ मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी असल्याचं मानलं जातं. मुंढे जिथे जातात तिथे दबदबा निर्माण करतात. त्यांच्या कामाच्या धडाक्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरते. तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे बदल्यांना सामोरे जावे लागल्याचं मानलं जातंय. कडक शिस्तीमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आत्तापर्यंत कधी व कुठे झाली बदली
ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै २००९ – सीईओ, वाशिम
जून २०१० – सीईओ, कल्याण
जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी
मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – २०२२ – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
२९ नोव्हेंबर २०२२ –
जून २०२२ – मराठी भाषा विभाग
जुलै २०२२ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून २०२३ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)