Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडाICC ची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश; ३ भारतीयांसह ८ जण...

ICC ची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश; ३ भारतीयांसह ८ जण जाळ्यात

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयसीसीने (ICC) एका लीगमध्ये मॅच फिक्सिंग (Match fixing) झाल्याचा दावा केल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आयसीसीकडून एकूण 8 जणांवर गंभीर आरोप करण्यात आले असून यात एकूण तीन भारतीयांचा समावेश आहे. तसेच बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूएईत २०२१ मध्ये टी -१० लीग स्पर्धेचा थरार रंगला होता. या लीगमध्ये ३ भारतीयांसह ८ अतिरिक्त लोक आणि काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार करण्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Nashik Crime News : मोटारसायकली चोरणारे जेरबंद; आठ लाखांच्या ‘इतक्या’ दुचाकी हस्तगत

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्यांची नावे पराग संगवी आणि कृष्णा कुमार अशी आहेत. हे दोघेही पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक आहेत. तसेच फलंदाजी प्रशिक्षक सन्नी ढील्लोचा देखील समावेश आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी ECB ची भ्रष्टाचार विरोधी पथक म्हणून नेमणूक केली होती. आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

पराग संगवी यांच्यावर सट्टा लावण्याचा तसेच भ्रष्टाचार विरोधी पथकाला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सन्नी ढील्लोचा यांच्यावर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह कृष्णा कुमार यांनी या सर्व गोष्टी DACO पासून लपवून ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारचा केंद्र सरकारला सवाल; सोशल मिडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करावी

तसेच, बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनला ७५० डॉलर्स भेट म्हणून मिळाले होते. ही माहिती त्यांनी लपवून ठेवली असा आरोप DACO ने केला आहे. आरोप करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत फलंदाजी प्रशिक्षक अझहर जैदी, व्यवस्थापक शादाब अहमद आणि यूएईचे खेळाडू रिजवान जावेद आणि सलिया समन यांचा समावेश आहे. आयसीसीने ६ खेळाडूंना निलंबित केले आहे. तर आरोपींना उत्तर देण्यासाठी १९ दिवसांचा अवधी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

INDIA Alliance: इंडिया आघाडी अजून मजबूत होणार; आणखी एक पक्ष आघाडीमध्ये सामिल होणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या