अहमदाबाद | वृत्तसंस्था
आय सी सी मेन्स टी २० विश्वचषकातील भारत विरुद्ध नेदरलँडचा क्रिकेटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर खेळण्यात आला. शिवम दुबेच्या तुफान फलंदाजीने ६६ धावा करत भारतीय संघाने एकूण ६ गडी बाद १९३ धावा करत १९४ धावांचे लक्ष नेदरलँडच्या संघापुढे दिले.नेदरलँडच्या संघाने ७ गडी बाद ७६ धावा केल्या. भारतीय संघाने नेदरलँडचा १७ धावांनी पराभव केला
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार सुर्यकुमार यादवने घेतला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व ईशान किसन सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या पहिल्या शतकाच्या तिसऱ्या चेंडूत सलामीला आलेला अभिषेक शर्मा आर्यन दत्त करवी शून्य धावसंख्येवर बाद झाला तर तिसऱ्या षटकात आर्यन दत्तच्या गोलंदाजीवर ईशान किसन १८ धावांवर त्रिफळाचीत झाला. सामन्याच्या ९ व्या षटकात लोगान व्हॅन बीकच्या गोलंदाजीवर रोएलॉफ व्हॅन डेर मेरवेने तिलक वर्माला झेल बाद केले. तिलक वर्माने २७ चेंडूत ३१ धावा केल्या.११ व्या षटका अखेर भारतीय संघाची ३ गडी बाद ७६ धावा अशी स्थिती होती.
कर्णधार सुर्यकुमार यादवने २८ चेंडूत ३४ धावा करत काइल क्लेनच्या गोलंदाजीवर बाद झाला.शिवम दुबेने तुफान फटकेबाजी करत ३१ चेंडूत ६ षट्कार व ४ चौकार लगावत ६६ धावा करत अखेरच्या षटकात झेल बाद झाला. हार्दिक पांड्या ने २१ चेंडूत ३ षट्कार लगावत ३० धावा केल्या.अखेरच्या षटकाच्या शेवटच्या रोएलॉफ व्हॅनने हार्दिक पांड्याला झेल बाद केले.२० व्या षटका अखेर भारतीय संघाने ६ गडी बाद १९३ धावा केल्या.
नेदरलँडच्या संघाकडून मायकेल लेविट व मॅक्स ओ’डॉड प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या ६ व्या षटकात वरून चक्रवर्तीने सलामीला आलेल्या मॅक्स ओ’डॉडला २० धावांवर क्लीन बोल्ड करत नेदरलँडच्या संघास पहिला धक्का दिला. आठव्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने मायकेल लेविटला २३ धावांवर झेल बाद करत नेदरलँडच्या संघाचा दुसरा खेळाडू बाद केला.
१३ व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने कॉलिन एकरमनला २३ धावांवर झेल बाद केले.तर पाठोपाठ वरून चक्रवर्तीने आर्यन दत्तला त्रिफळाचीत करत शून्य धावसंख्येवर तंबूत परत पाठविले. १४ व्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर वरून चक्रवर्तीने बास डी लीडेला झेल बाद करत नेदरलँडच्या संघाचा पाचवा खेळाडू बाद केला.बास डी लीडेने २३ चेंडूत ३३ धावा केल्या. १५ व्या षटका अखेरीस ५ गडी बाद ११८ धावा नेदरलँडच्या संघाची स्थिती होती.वॉशिंग्टन सुंदरने झॅक लायन-कॅशेला २६ धावांवर झेल बाद केले. २० व्या षटका अखेर नेदरलँडच्या संघाने ७ गडी बाद १७६ धावा केल्या.





