Friday, November 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal: दोन्ही पक्ष एकत्र आल्यास...राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर मोठं भाष्य, म्हणाले, त्यांना...

Chhagan Bhujbal: दोन्ही पक्ष एकत्र आल्यास…राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर मोठं भाष्य, म्हणाले, त्यांना काय हवंय…

नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जोरदार हालचाली सुरु आहे. काही वेळा पूर्वी पार्थ पवार यांनी पुण्यात आमदारांची बैठक घेतली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार जिजाई बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांनी इतक्या तातडीने ही बैठक का बोलावली आणि या बैठकीला ठराविक आमदारांनाच का बोलावले, याविषयी राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्क लढवले जात होते. तसेच सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून देखील राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन गेल्याचे बोलले जात आहे. असे असताना आता जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. आमच्या पक्षातील सर्व नेते आणि आम्ही बसून निर्णय घेऊ. त्यांना काय हवंय हे अद्याप आम्हाला कळलं नाही. आम्ही विचार करतो तेव्हा हे कसं काय जमणार आहे? सर्व एनडीएत जाणार आहेत? की सर्व इंडिया आघाडीत जाणार आहेत? याचा शोधबोध झाला नाही. सुनेत्रा ताईंनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ येईल तेव्हा सर्वांना कळेल. त्या आधी मला खात्री आहे, सुनेत्राताई आम्हा सर्वांना विश्वासत घेऊन सांगतील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; दोन जणांना अटक, २ जण जखमी

आम्हीही टीव्हीवर पाहत आहोत, कोण भेटतंय, कोण जातंय, काय झालं ते कळत नाही
विलिनीकरणाच्या चर्चा आम्ही सुद्धा ऐकत आहोत. सध्या मर्जर मर्जरचा खेळ सुरू आहे. विलिनीकरण व्हायचंच असेल तर दोन्ही बाजूने सांघिकरित्या खेळलं पाहिजे. एखादा प्लेअर जातो, तिकडे संपूर्ण टीम असते. काही चर्चा होते. मग काही झालं तर परत घरी येतात, असं चालत नाही. सांघिकरित्या खेळा. क्रिकेटची मॅच सुरू आहे. एकमेकांच्या गळ्यात हात घालून ठरवा. एकत्रितरित्या ठरवा. तुटक तुटक कुणीही असं काही करावं असं वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. आमच्यापर्यंत विलिनीकरणाच्या गोष्टी आल्या नाहीत. आम्हीही टीव्हीवर पाहत आहोत. कोण भेटतंय, कोण जातंय, काय झालं ते कळत नाही. तुम्ही त्यातून जो निष्कर्ष काढता तो आम्ही ऐकत असतो, असंही त्यांनी म्हटलंय.

पवारांना भेटलो, पण चर्चा नाही
मीही शरद पवारांना भेटलो. पण मर्जर मर्जर खेळाची चर्चा केली नाही. आमचे चांगले संबंध आहेत. पवारांचा स्वभाव असा आहे की, राजकारणातील किती मोठा दुश्मन असला तरी ते त्याच्याशी संबंध ठेवतात. त्याच्याशी प्रेमाने बोलतात. प्रत्येक गोष्टीत शत्रूत्व ठेवत नाहीत. ही गोष्ट आम्ही शिकलो. राज्यातील ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, असं त्यांनी सांगितलं.

शरद पवार माझे नेते
शरद पवार यांना अजित पवार गटाचे नेते आमदार भेटत असल्याचे त्यांना विचारले असता म्हणाले, पवार साहेबांना भेटायला मीही गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. घरीही गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाणं चूक नाही. माझ्या आयुष्यात दोन नेते आहेत. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार आहे. हे दोन्ही नेते माझे मार्गदर्शक आहेत. दुर्देवाने बाळासाहेब आज हयात नाही. पण शरद पवार यांचा पक्ष वेगळा आहे. मी वेगळ्या पक्षात आहे. बाकी सर्व माझे सहकारी आहेत. पक्षातील नेते आहेत, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच
सर्व एकत्र आले तर आनंद आहे. उद्या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, ठाकरे बंधू एकत्र आले तर जुन्या शिवसैनिकांना आनंद होईल. तसेच दोन पवार एकत्र आले तर ज्यांनी राष्ट्रवादी स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्यांना आनंद होईल. शरद पवार आणि मी राष्ट्रवादीची स्थापना केली. काही लोक त्यावेळी राष्ट्रवादीत यायला मागे पुढे पाहत होते. काँग्रेसमध्ये राहावं की राष्ट्रवादीत यावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे काही लोकं चार महिन्याने राष्ट्रवादीत आले. काही सहा महिन्याने आले. पण दोन्ही पवार एकत्र आले तर जुन्या जाणत्यांना आनंदच होईल, असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

पार्थ

पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीने बैठक बोलवली; बैठकीत नेमकी काय चर्चा...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेग घेतला आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय...