Friday, November 15, 2024
Homeराजकीयडॉक्टरांनो कारवाई करण्यास भाग पाडू नका : शरद पवारांची तंबी

डॉक्टरांनो कारवाई करण्यास भाग पाडू नका : शरद पवारांची तंबी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना संकट काळात खासगी डॉक्टरांनी रुग्ण सेवेसाठी पुढे येणे आवश्यक आहे. ज्या नाशिकमध्ये डॉक्टर्स घडविणारे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होऊ नयेत हे आश्चर्यजनक आहे.

- Advertisement -

डॉक्टरांचे सहकार्य मागावे आणि ते जर मिळत नसेल तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांवये डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. डॉक्टरांनी कारवाई करण्यास भाग पाडू नये असेही आवाहन पवारांनी अखेरीस केले.

लाॅकडाऊनमुळे राज्याचे उद्योग चक्र बाधित होऊ शकते. अर्थकारणासाठी मुंबई पुणे नाशिक नागपूर येथील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु व्हायला हवेत. तसेच परप्रांतिय मजुराना परत आणण्याची व्यवस्था करावी असेही पवार याप्रसंगी म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांची देखील येण्याची इच्छा होती. ते नाशिकचा दौरा करु शकतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत ठाकरे करोना संकटावर लक्ष केंद्रित करुन काम करत आहेत.

मुंबई व इतर ठिकाणी त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आम्ही काही जणांनी फिल्डवर जाऊन काम करायचे व सरकारला माहिती द्यायची त्यानंतर त्यावरती काम करत असलेल्या टिमने त्या संदर्भात उपाय योजना व नियोजन करायचे असे सध्या कार्य महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे करोनासारख्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळविले जाईल अशी आशाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या