Friday, May 24, 2024
Homeभविष्यवेधओठ फडफडतो का?

ओठ फडफडतो का?

जर एखाद्याचे ओठ फडफडले तर ते शुभ मानले जाते आणि जर हे फडफडणे शरीरीच्या वेगवेगळ्या भागात असेल तर त्याचा अर्थ बदलतो. आज आपण जाणून घेणार आहोत की वरच्या ओठांच्या फडफडण्याचा काय अर्थ आहे आणि खालच्या ओठांचे फडफडणे म्हणजे काय. तुमचा ओठ फडफडतो का? शुभ की अशुभ जाणून घ्या.

इंद्रिये फडफडणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ज्योतिषशास्त्रात याचा संबंध शुभ आणि अशुभ परिणामांशीही जोडलेला दिसून येतो. काही अवयवांचे फडकणे शुभ संकेत मानले जाते तर काही अवयवांचे फडकणे अशुभ मानले जाते. शुभ संकेत म्हणजे भविष्यात काही चांगले घडणार आहे. एखादी शुभ वार्ता समजू शकते, धनलाभ होऊ शकतो, घरात एखादे शुभ कार्य निश्चित होऊ शकते. अशुभ संकेत म्हणजे एखादी दुःखद वार्ता समजणे, धनहानी होणे, वाद होणे, मान-सन्मानाची हानी होणे अशा गोष्टी घडू शकतात. आपण फडफडणार्‍या ओठांबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकदा अचानक ओठ फडफडायला लागतात, ओठांच्या फडकण्याचा काय अर्थ आहे जाणून घेऊया.

- Advertisement -

ओठ फडकण्याचा अर्थ- जर एखाद्या व्यक्तीचे ओठ फडफडले तर ते त्याच्या येणार्‍या काळाबद्दल सांगते. ओठांचे फडकणे नवीन मित्र होतील तसेच, तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल असे संकेत देते. असे मानले जाते की, जेव्हा हे घडते तेव्हा नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळते.

वरचा ओठ फडफडणे – वरचा ओठाचे फडफडणे हे समुद्रशास्त्रात खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा आहे की, आगामी काळात तुम्हाला तुमच्या शत्रूंवर लवकरच विजय मिळवता येईल. तुमची संकटे दूर होणार आहेत आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे.

खालचा ओठ फडफडणे – एखाद्या व्यक्तीच्या खालच्या ओठाचे फडफडणे देखील खूप चांगले मानले जाते. समुद्रशास्त्रात याचा देखील शुभ अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळतील, गोड बातमी मिळू शकेल.

दोन्ही ओठांचे फडफडणे – दोन्ही ओठ एकत्र फडफडणे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देतात. हे शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असाही होतो की तुम्हाला कुठून तरी आदर मिळू शकतो. तर दुसरीकडे काही लोक याला अशुभही मानतात. दोन्ही ओठ फडफडल्यास शेजार्‍यांसोबत भांडण होण्याचीही शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या