Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशबहुमत न मिळाल्यास प्लॅन बी काय? अमित शाह काय म्हणाले…

बहुमत न मिळाल्यास प्लॅन बी काय? अमित शाह काय म्हणाले…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला असून भाजपला पुर्ण बहुमत मिळणार असल्याचाही दावा नेत्यांकडून करण्यात येतोय. आता एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आले की, ‘भाजपने बहुमताचा आकडा गाठला नाही तर त्यांच्याकडे काही प्लॅन बी आहे का?’ याला अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, याची खात्री असल्याचे अमित शाह म्हणाले. जर भाजप बहुमत गाठू शकले नाही तर, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाला त्यांनी ‘प्लॅन बी तेव्हाच तयार करतात, जेव्हा प्लन ए यशस्वी होण्याची शक्यता ६० टक्क्यांहून कमी असते.’मला पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या विजयासह सत्तेत परतत आहेत.”

हे ही वाचा: संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना…; राऊतांच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तरhttps://deshdoot.com/mns-leader-sandip-deshpande-criticized-sanjay-raut/

“मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. ६० कोटी लाभार्थ्यांची मजबूत फौज पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभी आहे. त्यांना कोणतीही जात किंवा वयोगट नाही. ज्यांना सरकारी योजनांचा फायदा झाला आहे त्यांना माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आहेत आणि ४०० जागा का द्याव्यात”, असे शाह म्हणाले.

सर्व भारतीयांना वाटते की देश सुरक्षित राहावा. जगात त्याचा सन्मान वाढावा. हा देश समृद्ध व्हावा. देश आत्मनिर्भर व्हावा. हा देश विकसीत व्हावा. गरीब असो वा श्रीमंत, गेल्या १० वर्षांत भारताचा जगात मान वाढला आहे, हे प्रत्येकाला माहिती असल्याचे ही शाह म्हणाले.

तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “मतदार म्हणून मला विश्वास आहे की, ते जिथे जातील तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल. अनेकांना मोठी बाटली दिसेल.” असा टोला पण त्यांनी लगावला.

संविधान बदलणार का?
भाजपचा ४०० पारचा नारा आणि संविधानात बदल करण्यासंदर्भातील चर्चांवरही अमित शहांनी यावेळी भाष्य केलं. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “आमच्याकडे गेल्या १० वर्षांपासून संविधान बदलण्यासाठी बहुमत आहे. पण आम्ही असं कधीच केलेलं नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास माझ्या पक्षाचा नाही. बहुमताचा दुरुपयोग केल्याचा इतिहास इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला होता. परंतु, हा… आम्हाला ४०० जागा जिंकायच्यात, कारण आम्हाला देशाच्या राजकारणात स्थैर्य आणायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या