Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसंपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना…; राऊतांच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर

संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना…; राऊतांच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai
राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होत आहे. तर प्रचार संपायला आता अवघे काही तास उरले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची एक मेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. त्यातच आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. त्यावरून आता आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना आज रोज मनसेवर का बोलावे लागतेय? या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यादिवशी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत. त्यामुळे ते वाट्टेल ती विधाने करतायेत. ४ जूननंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवारांकडून उबाठा संपवण्याची सुपारी घेतलीय ते सामनामध्ये संपादकच काय कारकून म्हणूनही राहणार नाही असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि…; राऊतांची राज ठाकरेंवर टीका

देशपांडे पुढे म्हणाले, आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना या सभेची उत्सुकता आहे. दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. केवळ राज्यातील नव्हे देशातील जनतेचे लक्ष या सभेवर असेल. सगळ्यांसारखी आम्हालाही उत्सुकता आहे. आम्हाला संपणारे बोलणारे ४ जूननंतर स्वत:चं संपणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या