Sunday, January 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआता चुकाल तर सर्वच ... - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

आता चुकाल तर सर्वच … – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई गुजरातला कशी न्यायची हे सत्ताधाऱ्यांचे नियोजन

मुंबई |

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा आज मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. सुरवातीस राज ठाकरे यांनी भाषणात खरे तर मी २० वर्षानंतर युती करत आहे, काही जण थांबले काही जन पक्ष सोडून गेले, आपलेच आहे ते परत येतील तिकीट वाटपा बद्दल काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत.,मराठी माणसाने एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न सुरु आहेत, मराठी माणूस म्हणून एकत्र या हिंदी सक्ती नंतर, कुठल्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या निवडणुकीत आज जर चुकला तर कायमचे मुकलात तुमच्या हातातून शहर जर गेली तर कुठ ही तक्रार करता येणार नाही मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हण्टले आहे.

- Advertisement -

भारताचा व महाराष्ट्राचा नकाशा दाखवत २०१४ पासून गौतम गौतम अदानी यांची उद्योग किती होते व आजच्या स्थितीला किती जास्त उद्योग आहेत हे फक्त १० वर्षात आहेत, जगात कुणीही इतके श्रीमंत झाले नसेल तेवढे अदानी श्रीमंत झाले आहेत असे म्हण्टले आहे. MMRDA येथे अदानी उद्योग समूहाला किती ठेके देण्यात आले याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखविली.मला कुणी उद्योग करू नये असे म्हणणे नाही पण एकाच उद्योगपतीवर का एवढी मेहेरबानी असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे, वाढवन बंदर पासून गुजरात जवळ आहे, मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याचे दूर विचार सरकार करत आहे आणि मराठी माणूस बेसावध आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

YouTube video player

एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या

Parner : एटीएम फोडून 25 लाख लंपास

0
भाळवणी |वार्ताहर|Bhalwani पारनेर तालुक्यातील (Parner) भाळवणी (Bhalwani) येथील स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी (ATM Broke) गॅस कटरचा वापर करून फोडले. एटीएममधून चोरट्यांनी 25 लाख रुपयांची...