घोटी | वार्ताहर | Ghoti
महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर म्हणुऩ ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) वरुणराजाने आपली मर्जी दाखवित (दि.३) रोजी पुन्हा जोरदार वृष्टी सुरु केली आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) २४ तासात २४० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला वाहून; आईने फोडला टाहो
या पावसामुळे भाम धरणाजवळ (Bham Dam) असलेल्या दरेवाडीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांची चांगलेच हाल झाले. ही माहिती समजताच आमदार हिरामण खोसकर यांनी भाम धरणाजवळ पुनर्वसन केलेल्या दरेवाडीत (Darewadi) पाहणी दौरा केला. यावेळी या दरेवाडी व पत्र्याच्या वाडीतील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या.
हे देखील वाचा : चणकापुर उजव्या कालव्यास रामेश्वर ल.पा साठी पाणी सोडा – खा. भास्कर भगरे
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाने नव्याने पुनर्वशीत झालेल्या भामनगर या ठिकाणी ४० कुटुंबाची वस्ती वसली आहे. भामनगरचे पुनर्वसन करण्यात आले त्याच वेळेस भामनगरच्या नाले गटाऱ्यांचे काम अजून ‘जैसे थे’ चं आहे. गेल्या पाच वर्षापासून भामनगरच्या (दरेवाडी) गावालगत असलेला नाला बांधण्यात यावा अशी मागणी केली होती. या नाल्यामुळे अनेक घरातील नागरिकांच्या घरांत शिरलेल्या पाण्याची पाहणी केली असता जवळच नाला तुंबल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी पुनर्वसनच्या संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यातील गाळ काढण्याच्या सुचना केल्या.
हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले
तसेच पुनर्वसनची अनेक कामे बाकी असल्याने येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन पुनर्वसनमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या सर्व समस्या येत्या आठ दिवसांत सोडवल्या जाईल असे आश्वासन आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. दरम्यान, या पाहणी दौऱ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, महिला आघाडीच्या अनिता घारे, सोमनाथ घारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा