Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला...

Nashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला वाहून; आईने फोडला टाहो

तीन वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागांत (Rural Area) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहतांना पाहायला मिळत आहे. तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाघाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातच आता रामकुंड (Ramkund) परिसरातून पुराच्या पाण्यातून एक २९ वर्षीय पर्यटक युवक व तीन वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यग्नेश पवार (वय २९, रा.ओझर) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे (Youth) नाव आहे. तो महावितरणमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून भुसावळ येथे नेमणूक होती. तो नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्प योग पूजेनिमित्त आला होता. यावेळी गोदावरी नदीत (Godavari River) पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने तो वाहून गेला. यावेळी त्याची आई देखील त्याठिकाणी उपस्थित होती. यावेळी डोळ्यादेखतच आपला तरणाबांड मुलगा वाहून गेल्याने तिने एकच टाहो फोडला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून सदर युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

दरम्यान, गंगापूर धरणातून (Gangapur Dam) आज दुपारी १२ वाजता एकूण ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता एकूण १ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच गोदाघाट परिसरातील दुकाने (Shop) देखील प्रशासनाकडून हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अखेर ‘त्या’ खुनाचा उलगडा; मुख्य मारेकरी गजाआड

नागरिकांनी सतर्क राहावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे – पालकमंत्री दादा भुसे

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेवून आपले पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे भुसे यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...