जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
शहरातील नगर रोडवरील एका अवैधरित्या दारू विक्री (Illegal Alcohol Sale) करणार्या हॉटेलवर परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने छापा (Police Raid) टाकत 11 हजार 25 रुपयांची दारु जप्त (Seized) केली आहे. जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने सोमवारी (दि.23) जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे छापा (Raid) टाकत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त (Alcohol Seized) केला. पोलिसांनी हॉटेल मालक कृष्णा तुकाराम रामराव ढोले यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.




