Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमSangamner : एलसीबीची अवैध दारुविक्रेत्यावर कारवाई

Sangamner : एलसीबीची अवैध दारुविक्रेत्यावर कारवाई

3 लाख 16 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या येलखोपवाडी येथील हॉटेल जय मल्हारवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.22) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी-विदेशी दारुसह कार असा एकूण 3 लाख 16 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भगवान थोरात, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यास रवाना केले.

YouTube video player

त्यानंतर पथकास शशांक निमसे हा अकलापूर गावांतर्गत असलेल्या येलखोपवाडी येथे हॉटेल जय मल्हारमध्ये देशी-विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून त्यास पकडले. तेथे उभी असलेल्या कारची झडती घेतली असता 16 हजार 445 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आणि 3 लाख रुपयांची कार असा एकूण 3 लाख 16 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी पोकॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांत शशांक नंदू निमसे (वय 22, रा. संतवाडी, निमसेमळा, आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...