Tuesday, March 25, 2025
Homeनगरअवैध धंद्यामुळे जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली

अवैध धंद्यामुळे जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली

एसपी ओला यांची खंत || अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. दरम्यान, अवैध धंदे रोखण्यासाठी सध्या पोलीस विभागाकडून केलेली कामगिरी ही प्रशंसेस पात्र नसल्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याची खंत अधीक्षक ओला यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस महासंचालक व नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आदेश दिल्यानंतर अधीक्षक ओला यांनी आदेश काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, लॉटरी, व्हिडीओ पार्लर, अवैध गुटखा, अवैध शस्त्र, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, अंमलीपदार्थ, डान्सबार, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वाळू वाहतूक आदी अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई करून त्याला आळा घालावा, असे आदेशात नमूद केले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत राजरोजपणे अवैध धंदे सुरू आहेत. ही बाब अतिशय बेजबाबदार व गंभीर दखल घेण्याजोगी आहे. काही ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई केल्यानंतर ते पूर्णपणे अद्यापही बंद झाल्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन झाल्याचे दिसून येत नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होऊन जनतेच्या तक्रारी वाढत जातात व त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याची खंत अधीक्षक ओला यांनी आदेशातून व्यक्त केली आहे.

प्रभारी अधिकारी यांनी आपल्या हद्दीत अवैध धंदा चालणार नाही याकडे लक्ष द्यावे, आपण स्वत: अवैध धंद्यावर धाडी टाकून संबंधित व्यक्तीविरूध्द कठोर कारवाई करावी, अवैध धंद्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे तसेच इतर माध्यमातून मदत करणार्‍यांवरही कारवाई करावी, कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी शासनाच्या इतर विभागाची मदत घ्यावी, आदी सूचना प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

प्रभारी अधिकार्‍यांवर होणार कारवाई
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून येईल त्या संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला त्याच्या कर्तव्यात अपयशी ठरल्याबाबत नियमानुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच संबंधित पोलीस ठाणे 1वा नाही याबाबत वरिष्ठांना तसा प्रतिकूल अहवाल सादर करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक ओला यांनी दिला आहे.

अन्यथा शेजारच्या जिल्ह्यातील पोलीस करणार कारवाई
जिल्ह्यातील पोलीस ठाणे आपआपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करू शकले नाहीत किंवा त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे समजल्यास यांची गंभीर दखल घेतली जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ कार्यालयाकडील आदेशाने शेजारील जिल्ह्यातील पोलीस पथक अचानक खात्री तथा कारवाई करिता पाठविण्यात येणार आहे. कारवाई यशस्वी झाल्यास संबंधित अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...