Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याअवैध मद्यसाठा जप्त

अवैध मद्यसाठा जप्त

वावी | प्रतिनिधी Vavi

- Advertisement -

वावी(Vavi ) येथील दुसंगवाडी फाटा ( Dusangwadi)या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री व साठा करण्यात आलेलला आहे. अशी गोपनीय माहिती वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक कांगणे व उप विभागीय पोलीस अधिकारी तांबे, यांच्या मार्गदर्शना खाली वावी पोलीस ठाण्याचे सपोनि सागर कोते यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, पोउनि विजय सोनवणे, पो.ह. नितीन मैद, शैलेश शेलार, भास्कर जाधव, पोशि तांबे, गोविंद सुर्यवाड यांचे पथक तयार करून गुप्तबातमीदार यांच्याकडुन सविस्त्र दारू साठा बाबत माहिती घेउन पंचासमक्ष परीसरात शोध घेतला.

सदर ठिकाणी झोपडयामध्ये देशी व विदेशी दारूचे एकुण २१ बॉक्स असे ७४००० रूपये किमतीची दारू मिळुन आली असुन वावी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करून संतोष शिवदास क्षत्रीय यांना अटक केली आहे. पोउनि गवळी, पोउनि सोनवणे, पोना मैद, पोशि शेलार, पोशि जाधव, पोशि सुर्यवाड, पोशि तांबे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू साठ्यावर कारवाई केली आहे..पुढील तपास पोलीस हवालदार दशरथ मोरे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या