Friday, May 3, 2024
Homeजळगावकापसाची नियमबाह्य नोंदणी : पारोळा बाजार समितीत गोंधळ

कापसाची नियमबाह्य नोंदणी : पारोळा बाजार समितीत गोंधळ

पारोळा – प्रतिनिधी Parola

सीसीआय व पणन महासंघ या दोन्ही एजन्सीकडून जिल्ह्यात अद्याप एकही कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही तरीही येथील बाजार समितीने आतापर्यंत तब्बल 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची कापूस खरेदीसाठी नोंदणी केली ही नियमबाह्य नोंदणी बंद करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सोमवारी दिले होते

- Advertisement -

यामुळे शेतकरी संभ्रमात पडले. जिल्हा उपनिबंधकांनी योग्य निर्णय घेऊन प्रारंभी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करावा, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली तर पुढील काळात ऑनलाइन प्रणालीनुसार नोंदणी झाल्यास आम्हाला प्राधान्य द्यावे अशी मागणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी केली.

पारोळा बाजार समितीने 9 ऑक्टोंबर पासून नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली. यामुळे 12 ऑक्टोबरला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ही नाव नोंदणी थांबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार 13 रोजी ही नोंदणी थांबवताच बाजार समितीत अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

परिसरात गर्दी करून दिशाभूल थांबवावी असा आग्रह धरला तर तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे डॉक्टर पृथ्वीराज पाटील, किशोर पाटील, दत्तू पाटील, अधिकार पाटील, निकम पाटील, सुनील देवरे, नितीन देसले, उमेश पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या