Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Crime News : संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

2700 किलो गोमांससह 34 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सतत कारवाया करुनही येथील अवैध कत्तलखाने (Illegal Slaughterhouses) सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सोमवारी (दि.30) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जमजम कॉलनी येथे छापा (Raid) टाकून 2700 किलो गोमांससह (Beef) 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळसाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत रवाना केले.

YouTube video player

सोमवारी हे पथक शहर पोलीस ठाणे हद्दीतील (Sangamner Police Station) अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली, की जमजम कॉलनी येथे हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे पत्र्याच्या गोडावूनमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा (Raid) टाकला असता 8 ते 9 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले.

पथकाने येथून 2700 किलो गोमांस, 2 पिकअप, 1 बडा दोस्त, 5 दुचाकी वाहन, 4 इलेक्ट्रिक वजन काटे, लोखंडी सुरा, लोखंडी कुर्‍हाड व 2 मोबाईल असा एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत हाजी मुदस्सर कुरेशी, नवाज जावेद कुरेशी, फईम कुरेशी, अक्रम कुरेशी, समीर कुरेशी (तिघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व इतर 4 ते 5 अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, सर्वजण पसार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...