Friday, May 3, 2024
Homeनाशिकबोगस डॉक्टरांना औषध साठ्यासह अटक

बोगस डॉक्टरांना औषध साठ्यासह अटक

बार्‍हे । वार्ताहर

उंबरठाण ता. सुरगाणा परिसरात मंगळवारी तहसीलदार किशोर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कार्यवाहीत दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांना औषध साठ्यासह अटक करण्यात आली. तर काही अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक फरार झाले आहेत.

- Advertisement -

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात कोविड आढावा बैठक संपन्न झाली होती.

या आढावा बैठकी दरम्यान माजी आमदार जे. पी. गावित यांनी तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाहीची मागणी केल्यानंतर प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आरोग्य विभागास तसे आदेश दिले होते.

त्यानुसार मंगळवारी किशोर मराठे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, आरोग्य विस्तार अधिकारी एम. ए. अन्सारी, सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे, पोलीस हवालदार पी. के. सहारे, जी जे धुमसे, चंद्रकांत दवंगे, चालक बी. डी. निकम यांनी उंबरठाण परिसरातील बेंडवळ येथे अचानक छापा टाकून अपूर्वा नलिन विश्वास रा. पुलताला (पश्चिम बंगाल) हल्ली मुक्काम बेंडवळ व उंबरठाण येथील सुनील चांपकलाल कुमट या दोघांची वैद्यकीय पदवीची पडताळणी केली असता अपूर्वा विश्वास याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले.

सुनिल कुमट याच्याकडे इलेक्ट्रॉपॅथी चे प्रमाणपत्र असताना ऍलोपॅथीचा औषधसाठा सापडल्याने या दोघांना औषधासाठ्यासह ताब्यात घेण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपूर्वा विश्वास व सुनिल कुमट या दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तालुक्यात प्रथमच अशी धडक कार्यवाही झाल्यामुळे अनेक बोगस डॉक्टर फरार झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या